बॉलीवूडचा दबंग सलमान खान हा त्याच्या शरिरयष्टीविषयी किती जागरुक आहे हे काही वेगळे सांगायला नको. आजवर सलमानचा असा एकही चित्रपट नाही ज्यात त्याने शर्ट काढून आपली बॉडी दाखविली नसेल. आपल्या फिटनेसबाबत दक्ष असलेल्या सलमानचे सिक्स पॅक अॅब्ज हे खोटे असल्याची मध्यंतरी बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर आता सलमान हा आगामी सुलतान चित्रपटात कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील त्याच्या पिळदार शरिरयष्टीने सर्वांचेच लक्ष वेधले. त्यावरूनच सलमानवर स्पूफ करण्यात आलेयं.
सलमानचा प्यार किया तो डरना क्या पासून ते आगामी सुलतान चित्रपटाचा या स्पूफमध्ये समावेश करण्यात आला आहे. सुलतान चित्रपटाच्या ट्रेलरची खिल्ली या व्हिडिओत उडवण्यात आली आहे. सलमानचे सिक्स पॅक हे खोटे असून त्यावर केस करायला पाहिजे असे यात गंमतीने म्हटले आहे. त्याबाबत काही कलाकारांच्याही प्रतिक्रिया घेण्यात आल्या आहेत. अखेर सलमान हा सचिन तेंडुलकरकडे धाव घेतो. तेव्हा सचिन त्याला विराटकडे जाण्याचा सल्ला देतो. त्यानंतर विराट कोहली सलमानला कसे धडे देतो ते तुम्ही या विनोदी व्हिडिओतचं बघा.