News Flash

वेबकिंग सुमित व्यासने बांधली लग्नगाठ

सुमितने प्रियसी एकता कौलबरोबर १५ सप्टेंबर रोजी जम्मूमध्ये लग्न केलं.

वेब सीरिज आणि सुमित व्यास हे समीकरण जणू ठरलेलंच आहे. ‘परमनंट रुममेट्स’, ‘ट्रिपलिंग’ या वेब सीरिजमधून झळकलेला अभिनेता सुमित व्यास अनेकांच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सुमित व्यासने अभिनयाच्या जोरावर स्वत:चा असा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. नुकताच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात झळकलेला या अभिनेत्याने त्याच्या प्रियसीबरोबर लग्नगाठ बांधली आहे.

सध्या सुमितच्या लग्नाचे हे फोटो व्हायरल होत असून तो फुलऑन मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहे. आणि सुमितने प्रियसी एकता कौलबरोबर १५ सप्टेंबर रोजी जम्मूमध्ये लग्न केलं असून सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

पारंपारिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यामध्ये सुमित आणि एकताच्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराचा समावेश असल्याचं पाहायला मिळालं. या सोहळ्याचे काही फोटो टेलिव्हिजन अभिनेत्री मालिनी कपूरने शेअर केले आहेत.

दरम्यान, सुमित व्यासचं हे दुसरं लग्न असून यापूर्वी त्याने अभिनेत्री शिवानी टाकसाळे हिच्याबरोबर लग्नगाठ बांधली होती. मात्र त्यांचा संसार फार कमी काळ टिकू शकला. लग्नानंतर काही काळातच या दोघांनी कायदेशीररित्या वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता सुमितने पुन्हा एकदा लग्नाचा निर्णय घेत एकताबरोबर सप्तपदी घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2018 3:20 pm

Web Title: sumeet vyas married to ekta kaul see inside viral pics
Next Stories
1 Bigg Boss 12 : जाणून घ्या, ‘भजन सम्राट’ अनुप जलोटा यांच्या गर्लफ्रेंडबद्दल
2 गांजा,कोकेनवरुन मुंबई पोलिसांनी उडविली उदय चोप्राची खिल्ली, म्हणाले…
3 Bigg Boss 12 : ३७ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडमुळे अनुप जलोटा ट्रोल; प्रियांका-निकशी केली तुलना
Just Now!
X