News Flash

‘या’ तारखेला प्रदर्शित होणार ‘हाय जॅक’

त्या विमानातील सगळेच प्रवासी एका चुकेमुळे मद्यधुंद अवस्थेत जातात आणि मग खऱ्या हास्यकल्लोळ प्रवासाला सुरूवात होते

amey wagh, nipun dharmadhikari
अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी

मराठीतील लोकप्रिय जोडी अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी लवकरच ‘हाय जॅक’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आकर्ष खुराना दिग्दर्शित या सिनेमात सुमित व्यास, मंत्रा, सोनाली सैगल, कुमुद मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या १८ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. फॅण्टमची निर्मिती असलेला हा बॉलिवूडमधील पहिला स्टोनर कॉमेडी सिनेमा म्हणून ओळखला जाणार आहे.

चार ते पाच मित्र मिळून पहिल्यांदा विमान हायजॅक करतात. त्या विमानातील सगळेच प्रवासी एका चुकेमुळे मद्यधुंद अवस्थेत जातात आणि मग खऱ्या हास्यकल्लोळ प्रवासाला सुरूवात होते. सुरूवातीला या सिनेमाची तारीख २० एप्रिल ठरवण्यात आली होती. पण काही कारणांमुळे सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. पण आता १८ मे रोजी हाय जॅकची संपूर्ण टीम प्रेक्षकांना खळखळून हसवायला सज्ज झाली आहे. आकर्ष खुरानाचा हा दिग्दर्शनातील पहिलाच सिनेमा असल्यामुळे त्याला या सिनेमाकडून फार अपेक्षा आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षकांना किती आवडतो की नाही हे तर येणारा काळच ठरवेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2018 6:19 pm

Web Title: sumeet vyas starrer high jack movie will release on 18th may
Next Stories
1 गोष्ट नि:स्वार्थ नात्याची- ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ लवकरच कलर्स मराठीवर
2 Raazi Box Office Collection: अवघ्या दोन दिवसांत ‘राझी’ने केली एवढी कमाई
3 Mother’s Day: ऐश्वर्याने शेअर केला आराध्यासोबतचा खास व्हिडिओ
Just Now!
X