News Flash

गणपती बाप्पा मोरया! सेटवर सुमीत राघवनने साजरा केला ‘टीम इंडिया’चा विजय

त्याने 'वागळे की दुनिया' या मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात ऐतिसहासिक विजयाची नोंद करत भारताने मालिका खिशात घातली. अनेक आव्हानांचा सामना करत भारताने मिळवलेल्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान मराठमोळा अभिनेता सुमीत राघवनने ट्वीट करत मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

सुमीत राघवनने ‘वागळे की दुनिया’ या मालिकेच्या सेटवर भारताच्या ऐतिसहासिक विजयाचा आनंद साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘वागळे की दुनिया सेटवरील व्हिडीओ.. गणपती बाप्पा मोरया..’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा- ‘गाबा’चं घर खाली! कांगारुंवर ७० वर्षांनी नामुष्की, टीम इंडियाने रचला इतिहास

अभिनेता रितेश देशमुखने देखील ट्वीट करत भारताच्या ऐतिहसिक विजयाचा आनंद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- मॅच जिंकण्यासाठी खेळायचं तेव्हाच ठरवलं- अजिंक्य रहाणे

‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अजिंक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि झटपट धावा काढणाऱ्या ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासाह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 2:47 pm

Web Title: sumit raghvan tweet on team india beat australia historic win of test series avb 95
Next Stories
1 शूटिंगदरम्यान आलियाची प्रकृती बिघडली, करण्यात आले होते रुग्णालयात दाखल
2 करोना काळात चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मास्टर’ची बॉक्स ऑफिसवर जादू
3 ‘डॉक्टर डॉन’ मालिकेत होणार नव्या कलाकारची एण्ट्री?
Just Now!
X