News Flash

‘कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्री आर्थिक संकटात; २०११ पासून ‘या’ आजाराने आहे त्रस्त

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा’मध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणजे सुमोन चक्रवर्ती. या शोच्या माध्यमातून सुमोनने अनेकांच्या मनात घर केले आहे. सध्या लॉगडाउनमुळे कपिल शर्मा शोचे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे सुमोनवर आर्थिक संकट कोसळले आहे. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान तिने २०११ पासून एका आजाराचा सामना करत असल्याचे देखील सांगितले आहे.

सुमोनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक वर्कआऊट करतानाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘खूप दिवसांनंतर मी घरात वर्कआऊट केला आहे. मी सध्या बेरोजगार असले तरी माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे पोट भरु शकते. कधी कधी माझ्या मनात अपराधीपणाची भावना येते. खास करुन जेव्हा मी स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मी यापूर्वी याबाबत सांगितले नव्हते. मी २०११ पासून एंडोमेट्रिओसिस या आजाराशी लढत आहे. या आजाराच्या चौथ्या स्टेजचा मी सामना करत आहे. चांगले जेवणे, व्यायाम आणि ताणवमुक्त आयुष्य यावरचा उपाय आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले.

आणखी वाचा : ‘आई-वडिलांची मदत घेऊ शकत नाही’, कमल हासन यांच्या मुलीवर कोसळलं आर्थिक संकट

पुढे ती म्हणाली, ‘लॉकडाउन माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या कठीण होता. मी आज वर्कआऊट केला आणि मला बरं वाटलं. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जात असतो. प्रत्येकाला संघर्ष करावा लागतोच.’

सुमोनने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘बडे अच्छे लगते है’, ‘जमाई राजा’, ‘कस्तुरी’, ‘कसम से’ यांसारख्या मालिकांमध्ये ती दिसली होती. पण ‘द कपिल शर्मा शो’मुळे ती घराघरात पोहोचली. तिने ‘किक’, ‘बर्फी’ आणि ‘फिर से’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 1:54 pm

Web Title: sumona chakravarti reveals she is jobless in latest post avb 95
Next Stories
1 अभिनेत्रीचा श्वान हरवला! शोधून देणाऱ्याला १ लाख रुपयांच बक्षीस
2 करीनाच्या दुसऱ्या मुलाला सोशल मीडियावर गरजेपेक्षा जास्त महत्व दिले जाते- आदर्श गौरव
3 ७४ वर्षीय रणधीर कपूर यांनी केली करोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
Just Now!
X