02 March 2021

News Flash

सुमोना कपीलचा शो सोडण्याच्या तयारीत?

सुमोना चक्रवर्ती ही कपिलचा शो सोडणार असल्याची जोरदार चर्चा टेलिव्हिजन विश्वात आहे.

सुमोना चक्रवर्ती

‘द कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती ही कपिलचा शो सोडणार असल्याची जोरदार चर्चा टेलिव्हिजन विश्वात आहे. सुमोना या शोमध्ये सरलाची भूमिका साकरते. मिळालेल्या माहितीनुसार, सुमोना या आपल्या भूमिकेवरून निर्मात्यांवर नाराज झाली आहे. कपिलच्या शोमध्ये आणखी एक नवीन पात्र समाविष्ट करण्याची तयारी सुरू आहे. कपिलच्या प्रेमिकेची भूमिका साकारणारे हे नवीन पात्र असणार आहे. त्यावर सुमोनाने हरकत घेतली असल्याचे समजते. याशिवाय, तिने निर्मात्यांकडे आपल्या मानधनात वाढ करण्याचीही मागणी केली होती. त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने ती या शोला रामराम ठोकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कपिल आणि सुमोनाची जोडी ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोमधून लोकप्रिय झाली होती. शोमध्ये सुमोना कपिलच्या पत्नीच्या भूमिकेत दिसून आली होती. कपिल आणि सुमोना एकमेकांची टेर खेचताना या शोमध्ये धम्माल उडवून देत असत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 3:47 pm

Web Title: sumona chakravarti to quit the kapil sharma show
Next Stories
1 VIDEO: अनिल कपूरच्या मुलाची बॉलीवूडमध्ये दमदार एण्ट्री, ‘मिर्झया’चा टीझर प्रदर्शित
2 मोदींना निहलानींसारख्या चमच्यांची गरज नाही; केंद्राच्या भूमिकेने निहलानी तोंडघशी
3 चित्रिकरणासाठी ‘गेटवे’वर प्रवेशबंदी
Just Now!
X