News Flash

‘द कपिल शर्मा’ शोमधील ‘या’ अभिनेत्रीचा फोटो व्हायरल; अंदमानमध्ये खास व्यक्तीसोबत धमाल

कोण आहे सुमोनासोबत ?

लॉकडाउन आणि शूटिंग बंद असल्याने सध्या अनेक सेलिब्रिटी सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणांवरील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ‘द कपिल शर्मा शो’ मधील अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीदेखील सध्या अंदमान आणि निकोबारमध्ये सुट्टीसाठी गेली आहे. सुमोनाच्या खास मित्राने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून हे फोटो चांगेलच व्हायरल होत आहेत.

‘द कपिल शर्मा शो’ मुळे सुमोना चांगलीच लोकप्रिय आहे. सुमोनाने या शो आधी काही सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलंय. मात्र ‘द कपिल शर्मा शो’ ने सुमोनाला खरी ओळख दिली. या शो मधील कपिल शर्मासोबतची तिची धमाल त्यांची भांडणं पाहणं प्रेक्षक कायम पसंत करतात. सुमोना सध्या अंदमानमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय. समुनोचे अंदमानमधील काही फोटो समोर आले असून या फोटत सुमोनासोबत असलेली व्यक्ती कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांमध्ये उपस्थित केला जातोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohit Midha (@wildlywisewanderer)

सुमोनाच्या या फोटोमध्ये ती एका व्यक्तीसोबत पोज देताना दिसतेय. तिच्यामागे निळाशार समुद्र दिसतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये, ” किती मस्त सरप्राइज आहे , एका जवळच्या मित्राला इथं भेटणं” असं लिहलं आहे. मात्र ही व्यक्ती नेमकी कोणं आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

“..दिखावा करण्याची गरज नाही”; फिरायला जाणाऱ्या सेलिब्रिटींवर श्रुति हसन नाराज
मीडिया रिपोर्टनुसार या व्यक्तीचं नाव मोहित मुधा असून ते सुमानाचे चांगले मित्र आहेत. शिवाय ते एक फोटोग्राफर आहेत. सुमोनाचा एक बिकिनीमधील फोटो देखील त्यांनी टिपला असून सुमोनाने तो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 3:09 pm

Web Title: sumona chakravarti vacation in andaman photo goes viral with mystery man kpw 89
Next Stories
1 ‘तिसरं मूल झालं तर तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे’, कंगना रणौत
2 “दिशा आली तर ठिक नाही तर ..”, दयाबेनच्या वापसीवर असित मोदीं म्हणाले..
3 “त्या दोघांनी मला आणि श्रीदेवीला एका खोलीत बंद केलं..तरीही आम्ही एकमेकींशी बोललो नाही”- जया प्रदा
Just Now!
X