News Flash

जेव्हा शूटिंग लवकर संपत तेव्हा!, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेमधील कलाकारांचा धमाल डान्स

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सध्या अनेक मराठी मालिकांच शूटिंग महाराष्ट्राबाहेर सुरू आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये म्हणून राज्याबाहेर मालिकांचं शूटिंग सुरू करण्याचा निर्णय अनेक निर्मात्यांनी घेतलाय. कलाकार मालिकांमधून कायमच आपलं मनोरंजन करत असतात. तसचं सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील ते चाहत्यांच्या संपर्कात राहून त्यांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेला आणि या मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. अशात या मालिकेतील लितीका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईकने एक धमाल व्हिडीओ शेअर केलाय.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईकने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक धमाल व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत मालिकेतील अभिमन्यू तसचं इतरही सहकलाकार दिसत आहेत. साउथ सिनेमातील गाजलेलं गाणं “बुट बोमा’ वर त्यांनी ठेका धरत डान्स केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अक्षया म्हणालीय, ” जेव्हा तुम्ही नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर पॅकअप करता.” असं म्हणत तिने हॅशटॅगमध्ये ‘माय गँग’ असं म्हंटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

शूटिंग लवकर संपल्याने मालिकेतील या कलाकारांनी एकत्र येत अशी धमाल केलीय. या व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळतेय. तर अभिनेत्री पूजा हेगडेने देखील कमेंट बॉस्कमध्ये काही स्माईली देत या व्हिडीओला पसंती दिलीय. एक युजर कमेंटमध्ये म्हणाला, ” हा व्हिडीओ मी १०० वेळा पाहू शकतो.” तर एका युजरने मला तुमचा अजून डान्स पाहायचा आहे अशी कमेंट केलीय़.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 2:55 pm

Web Title: sundara manamadhe bharali team dancing as they pack up earlier than usual video goes viral kpw 89
Next Stories
1 “आम्हाला ‘टीव्ही कलाकार’ असा लेबल दिला जातो”, घराणेशाहीवर अभिनेत्याने व्यक्त केला संताप
2 जान्हवी कपूरने मालदीवमधील बिकिनीतील फोटो केला शेअर; ट्रोल होण्याआधीच म्हणाली…
3 ‘गॉड ऑफ नेपोटिझम’चा ठपका घालवण्यासाठी करण जोहरने आखला ‘मास्टरप्लान’
Just Now!
X