सुंदर दिसणं ही प्रत्येकाचीच स्वाभाविक भावना असते. सौंदर्याची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगळी असते. याच विषयाला धरून कलर्स मराठीने एक आगळी वेगळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणली. एका लठ्ठ पण गोड मुलीची दमदार गोष्ट ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत पाहायला मिळतेय. आता मालिकेत सुंदराला सज्जनरावांकडून लग्नासाठी होकार मिळाला. त्यानंतर लतीच्या घरामध्ये लगीनघाई सुरू झाली आहे.
या लग्नकार्यात काही विघ्नसुद्धा आले. पैशांच्या झालेल्या गडबडीमुळे सज्जन आणि त्याच्या घरच्यांनी लग्नाच्या दिवशी नकार दिला आणि लतिकाला मंडपात सोडून निघून गेले. मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. हा सगळा प्रकार लतिकाच्या वडिलांसाठी सहन करणं अशक्य झाले आहे. त्यांची ही स्थिती बघता अभिमन्युचे वडील महत्त्वाचा निर्णय घेतात. लतिकाचे लग्न अभिमन्युशी करण्याचा हा निर्णय असतो.
लतिका आणि अभिमन्यूचा हा लग्नसोहळा कसा पार पडेल. अभिमन्यू लग्न करण्यास होकार देईल का, हे प्रेक्षकांना लग्न विशेष भागात पाहायला मिळेल. हा भाग १६ ऑक्टोबर रात्री ९.०० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 1:15 pm