बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने तिच्या आवाजाच्या जादूने आजवर अनेक रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आजवर सुनिधीने अनेक सुपरहीट गाणी गायली आहे. तिच्या जबरदस्त आवाजाने तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तर संगीत प्रेमींनी देखील सुनिधीला भरभरून प्रेम दिलं आहे. सुनिधी चौहानला आज बॉलिवूडमध्ये यश मिळालं असलं तरी एकेकाळी सुनिधीलादेखील मोठा संघर्ष करावा लागला होता. करिअरच्या सुरुवातीला सुनिधीला अनेक संगीत दिग्दर्शकांच्या खोचक शब्दाचां सामना करावा लागला.

बॉलिवूड बबलला दिलेल्या एका मुलाखतीत सुनिधीने तिच्या संघर्षाच्या काळातील काही अनुभव सांगितले आहेत. यावेळी ती म्हणाली, “एका नावाजलेल्या संगीत दिग्दर्शकाने माझा आवाज पुरुषी असून तो अभिनेत्रीसाठी देणं योग्य वाटतं नाही असं म्हंटंल होतं. तसचं बॅग भर आणि घरी जा असं दिग्दर्शकाने म्हंटलं” असं सुनिधीने सांगितलं.

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

या मुलाखतीत सिनिधी म्हणाली की माझ्या करिअरच्या सुरुवातीला मला अशा काही गोष्टी ऐकायला मिळाल्या, ” तू तुझ्या बॅग भर आणि घरी जा कारण तू ‘लग जा गले’ हे गाणं ओलिजनल कीमध्ये गाऊ शकत नाहिस.” ती म्हणाली मी हे गाणं लता दीदींनी गायलेल्या गाण्यापेक्षा खालच्या पट्टीत गायलं मग ते मूळ गाण्यासारखं कसं असणार. त्यामुळे दिग्दर्शकाला ते आवडलं नाही आणि तो म्हणाला, ” बाळा घरी जा आणि रियाज करुन ये”

सुनिधीने सुरुवातीच्या काळातील आणखी एक अनुभव सांगितला आहे. एक दिग्दर्शतक तिला म्हणाला, ” असा आवाज चालणार नाही, तुझ्या आवाज खूप कणखर आहे. असं वाटतंय एखादी अभिनेत्री पुरुषी आवाजात गातेय. तुझ्या बॅगा भर, फक्त एक-दोन वर्षांची गोष्ट आहे. तू घरी जा” असं सुनिधीने सांगितलं. या दोन्ही दिग्दर्शकांनी पुढे जाऊन तिच्यासोहत एकत्र काम केल्याचंही तिने सांगितलं. “जणू ते सर्व विसरले” असं ती म्हणाली.

सुनिधीने आजवर ‘कमली’ , ‘धूम मचाले’ , ‘मेहबूब मेरे’, ‘भागे रे मन कही’ अशी अनेक वेगवेगळ्या अंदाजातील गाणी गायली आहेत.