News Flash

सुनील ग्रोवरला डेंग्यूची लागण, रुग्णालयात केले दाखल

मुंबईतील रुग्णालयात सुनीलवर उपचार सुरु

सुनील ग्रोवर

कॉमेडियन सुनील ग्रोवरला डेंग्यूचे निदान झाले असून त्याला मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ‘मला डेंग्यूचे निदान झाले असून सध्या रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरु आहेत. मी लवकरच बरा होईन’, असे सुनीलनेच ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.

ऑस्ट्रेलियाहून परतत असताना विमानप्रवासादरम्यान कपिल शर्मासोबत झालेल्या वादानंतर मार्चमध्ये सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’ सोडला. त्यानंतर तो टेलिव्हिजनवर फार क्वचित झळकला. सोनी वाहिनीच्या काही रिअॅलिटी शोमध्ये त्याने कॅमिओ केले आणि सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दोन तासांचा विशेष कार्यक्रम केला. त्याचा स्वत:चा कॉमेडी शो छोट्या पडद्यावर येणार असल्याच्या बऱ्याच चर्चा ऐकायला मिळाल्या. मात्र याबाबत कोणतीच खात्रीलायक बातमी समोर आली नाही. कमबॅक करण्याचा जरी त्याचा काही विचार असला तरी आता डेंग्यूमुळे ते लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाचा : आर्यनचा फोटो पोस्ट करताना गौरीला कोणाची वाटतेय भीती?

एकीकडे सुनीलला डेंग्यूची लागण झाली असतानाच त्याचा मित्र आणि सहकलाकार कपिल शर्माची तब्येतसुद्धा गेल्या काही दिवसांपासून बरी नाही. आरोग्याशी निगडीत कारणांमुळे कपिलने काही काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय. ‘द कपिल शर्मा शो’ काही काळासाठी बंद होतोय. कपिल जेव्हा बरा होईल तेव्हा हा शो पुन्हा एकदा सुरु करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 8:46 pm

Web Title: sunil grover diagnosed with dengue
Next Stories
1 आर्यनचा फोटो पोस्ट करताना गौरीला कोणाची वाटतेय भीती?
2 जिया खान आत्महत्याप्रकरणी सूरज पांचोलीविरोधात खटला, उच्च न्यायालयाचे आदेश
3 मी पूर्ण ताकदीने परत येणार- कपिल शर्मा
Just Now!
X