26 February 2021

News Flash

‘असं, कोणी सोडून जातं का भाऊ?’

मी फक्त पैशांसाठी काम करत नाही. तर मला माझी इज्जतही प्रिय आहे

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात विमान प्रवासात झालेला वाद माहिती नसेल अशी व्यक्ती विरळाच.

आपल्या विनोदांनी खळखळून हसवणारा प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा याच्या स्वतःच्याच चेहऱ्यावरचे हसू सध्या गायब झाले आहे. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात विमान प्रवासात झालेला वाद माहिती नसेल अशी व्यक्ती विरळाच. या दोन विनोदवीरांमधील वाद दिवसेंदिवस चिघळत असून त्याचा फटका मात्र ‘द कपिल शर्मा शो’ला पडत आहे. कपिलसोबत झालेल्या वादानंतर सुनील ग्रोवरने शोमधून काढता पाय घेतला आहे. या प्रकरणी खुद्द कपिलनेही झाल्या प्रकरणी सुनीलची जाहीरपणे माफी मागितली होती. पण, त्याचा काहीही परिणाम होताना दिसला नाही. उलट, सुनीलसोबत चंदन प्रभाकर आणि अली असगर यांनीही त्या दिवसानंतर चित्रीकरणासाठी हजेरी लावलेली नाही. या तिघांची अनुपस्थिती भरून काढण्यासाठी राजू श्रीवास्तव, एहसान कुरेशी आणि सुनील पाल यांना शोमध्ये आणण्यात आले. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही.

कपिलने मनधरणी करण्याचा बराच प्रयत्न करूनही सुनील काही परत शोमध्ये परतेल, अशी चिन्हं दिसत नाहीत. सुनील आणि इतर सहकलाकार मंडळी नसल्यामुळे ‘द कपिल शर्मा शो’च्या टीआरपीला बराच फटका बसला आहे. मात्र, १ एप्रिलला सुनीलने स्वतंत्र लाइव्ह शो करून त्याच्या चाहत्यांना खूश केले. एप्रिल फूलच्या दिवशी सुनीलने दिल्लीमध्ये ‘कॉमेडी क्लिनिक’ हा लाइव्ह शो केला. त्यावेळी डॉ मशहूर गुलाटीला पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या.

वाचा : #SairatMania : अन् ‘उबर’चा मेसेज आला ‘मंग्या ऑन द वे….’

दरम्यान, लोकांचे निखळ मनोरंजन करण्याचा एकमेव उद्देश असलेल्या सुनीलने काल कपिलवर थेट निशाणा साधणारे ट्विट केले. ‘मी फक्त पैशांसाठी काम करत नाही. तर मला माझी इज्जतही प्रिय आहे’, असे ट्विट करत सुनीलने त्याची भूमिका मांडली होती. त्याच्या या ट्विटमुळे आता तो नेमका कपिलच्या शोमध्ये परतणार की नाही याविषयी सर्वजण संभ्रमात आले आहेत. सुनीलच्या या ट्विटनंतर काही नेटिझन्सनी त्याला पाठिंबा देत त्याच्या निर्णयाची प्रशंसा केली. मात्र, काही नेटिझन्सनी त्याने पुन्हा कपिल शर्मा शोमध्ये परतावे असे म्हटले. ‘असं कोणी सोडून जातं का?’, ‘कपिल तुझा छोटा भाऊ आहे. आपल्या छोट्या भावाशी कोणी इतका वेळ नाराज राहू शकता का? आता माफ कर त्याला..’, अशा आशयाचे ट्विट नेटिझन्सनी सुनीलसाठी केले आहेत.

आपल्या चाहत्यांचा आणि त्यांच्या प्रेमाचा सुनील मनापासून आदर करतो. त्यामुळे, आपल्या चाहत्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पुन्हा परतणार का? हे येणारी वेळच सांगू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 9:15 am

Web Title: sunil grover fans plead for him to come back after his cryptic tweet for kapil sharma
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : अंतर्मनात डोकावण्याची दृष्टी लाभली
2 ‘पत्रकार’ सोनाक्षी सिन्हा  पत्रकारांवरील हल्ल्यांविषयी अनभिज्ञ!
3 #SairatMania : सहजच आलास अन् ‘सैराट’ झालास…
Just Now!
X