News Flash

कपिल आणि कृष्णाला टक्कर देण्यासाठी सुनीलचा लवकरच नवा ‘शो’

कृष्णा अभिषेकचाही शो बंद होणार?

सध्या भारतीय टेलिव्हिजन विश्वात कॉमेडी शोजचा भाव चांगलाच वाढला आहे. गेल्या वर्षभरात नावाजलेल्या शोमध्ये अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडल्यानंतर आता यातील कलाकारांमध्येही स्पर्धा पाहायला मिळत आहे. कारण, कपिल शर्माला टक्कर देण्यासाठी कृष्णा अभिषेकने नवा शो सुरु केला. मात्र, आता नव्या माहितीनुसार, कृष्णाला टक्कर देण्यासाठी सुनील ग्रोव्हर सज्ज झाला आहे. त्यासाठी आता सुनील आपला नवा कोरा शो घेऊन येणार आहे.

स्टँडअप कॉमेडिअन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात झालेल्या वादामुळे अनेक सेलिब्रेटिंना त्यांच्या शोमध्ये येण्यासाठी त्यांच्यातील वाद संपायची वाट पाहावी लागत होती. बऱ्याचदा तर या सेलिब्रेटिंना शेवटच्या क्षणी आपले चित्रीकरण थांबवावे लागले होते. त्यानंतर अखेर कपिलने तब्येतीचे कारण सांगत काही काळासाठी ब्रेक घेण्याचे ठरवले. त्यानंतर आता कृष्णा देखील आपला शो बंद करणार असल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान, या महिन्याच्या शेवटी शो बंद करणार असल्याचे कृष्णाने अधिकृतरित्या सांगितल्याचे सूत्रांकडून कळते.

शो बंद करण्याबाबत कृष्णाने सांगितले की, मर्यादित एपिसोड शूट केल्यामुळे हा शो बंद करण्यात येत नसून आम्ही काही नव्या गोष्टी प्रेक्षकांसाठी आणण्याच्या दृष्टीने विचार करीत आहोत. वाहिनीने सुनील ग्रोव्हरचा नवा शो आमच्याच टाईम स्लॉटमध्ये आणणार असल्याचे आम्हाला समजले. मात्र, आम्हाला याची माहिती देण्यात आलेली नाही. आमच्या शोच्या टीआरपीवर परिणाम झाल्यामुळे नव्हे तर आमच्या शोचा टाईम स्लॉट अचानक बदलण्यात आल्याने आम्ही शो थांबवणार असल्याचे कृष्णाने सांगितले आहे. कपिलच्या शोला रात्री ९ वाजण्याच्या स्लॉटमध्ये प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. तसा प्रतिसाद मिळवणे आम्हाला नव्या टाईम स्लॉटमध्ये शक्य होणार नाही. मात्र, सुनीलचा शो येत असला तर आपल्याला आनंदच असल्याचे कृष्णाने म्हटले आहे.

दरम्यान, कपिलची टीम तयारीत असून कपिलच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आम्ही पुन्हा नव्या जोमाने शुटींगला सुरुवात करणार असल्याचे किकू शारदाने एका न्यूज पोर्टलशी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात कुठल्या शोचे काय भविष्य असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 7:52 pm

Web Title: sunil grover is all set to replace kapil sharma and krushna abhishek on television
Next Stories
1 RK Studio Fire: ‘आर. के. स्टुडिओने आयकॉनिक स्टेज गमावला’
2 RK Studio Fire: आर. के. स्टुडिओला लागलेल्या आगीने जुन्या जखमा झाल्या ताज्या
3 PHOTOS : ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या सेटवरील आमिरचा लूक लीक
Just Now!
X