21 January 2019

News Flash

सुनील ग्रोवरला लागली लॉटरी; या प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत करणार काम

'दंगल गर्ल' सान्या मल्होत्रा आणि टेलिव्हिजन अभिनेत्री राधिका मदनसोबत साकारणार भूमिका

सुनील ग्रोवर

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडियन सुनील ग्रोवर आता दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी ‘छुरियाँ’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘मशहूर गुलाटी’, ‘गुत्थी’ आणि ‘रिंकू भाभी’ यांसारख्या भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता मोठ्या पडद्यावर सुनील कॉमेडी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.

‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सुनीलसोबत ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा आणि एकता कपूरच्या ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली राधिका मदन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘सुनीलचं अभिनय कौशल्य पाहून मी भारावलो. माझ्या चित्रपटात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अभिनेत्यासोबतच तो माणूस म्हणूनही तो सगळ्यांची मनं जिंकतो. प्रत्येक जण त्याच्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतो आणि आता त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे,’ असं विशाल भारद्वाज म्हणाले.

PHOTOS: टेलिव्हिजनची बहुचर्चित जोडी अडकली विवाहबंधनात

या चित्रपटातील एका भागासाठी सान्या आणि राधिका यांना १० ते १२ किलो वजन वाढवावे लागणार असून माऊंट अबू इथं शूटिंग करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली. आता सुनीलच्या या चित्रपटाबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून त्याची नेमकी भूमिका काय असणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

First Published on April 17, 2018 1:53 pm

Web Title: sunil grover to play the lead role in vishal bhardwaj chhuriyaan