लॉकडाउनमुळे मालिका तसेच चित्रपटांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. त्यामुळे घरात अडकून पडलेल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मालिकांचे भाग पुन्हा दाखवण्यास सुरुवात करण्यात आली होती. पण सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांनी रामनंद सागर यांची रामायण ही मालिका पुन्हा दाखवण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर दूरदर्शनने ८० आणि ९०च्या दशकातील सर्वच मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. पण रामायण मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते. या मालिकेतील कलाकार देखील पुन्हा एकदा चर्चत होते. आता मालिकेत लक्ष्मण हे पात्र साकारणाऱ्या सुनिल लहरींनी सोशल मीडियावर रामायणाच्या सेटवरचा फोटो शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुनिल लहरी हे सतत त्यांचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नुकताच त्यांनी रामायण मालिकेतील सेटवरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मालिकेतील रामाच्या वेशात अरुण गोविल आणि लक्ष्मणच्या वेशात सुनिल लहरी बसलेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत रामानंद सागर यांचा मुलगा सुभाष सागर आणि नातू ज्योति सागर बसलेला दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Pic. From set of Ramayan Sagar Sahib son Subhash Nagar and grandson Jyoti Sagar

A post shared by Sunil Lahri (@sunil_lahri) on

सुनिल लहरी यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट ‘जनम कुंडली’मधील फोटो शेअर केला होता. यामध्ये हॅण्डसम दिसत आहेत.