News Flash

‘या’ क्रिकेटपटूला डेट करते सुनील शेट्टीची मुलगी

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

लोकेश राहुल हा सध्या भारतीय संघात सलामीवीराची भूमिका बजावतो आहे. विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात शिखर धवनला झालेल्या दुखापतीनंतर लोकेश राहुलला सलामीच्या जागेवर बढती दिली. दरम्यान राहुलचे नाव एका बॉलिवूड अभिनेत्रीसह जोडण्यात आले आहे. सध्या त्या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. रोहित आणि अथिया फेब्रुवारी महिन्यापासून ऐकमेकांना डेट करत असल्याच्या देखील चर्चा आहे. त्या दोघांची कॉमन फ्रेंड आकांक्षा रंजनने नुकताच सोशल मीडियावर अथिया आणि राहुलसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे त्यांच्या नात्यांच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. तसेच अथिया आणि राहुल यांची ओळख देखील आकांक्षामुळे झाल्याचे म्हटले जात होते. या फोटोवर अथिया काय कमेंट करते या कडे लक्ष लागले आहे.

यापूर्वीही अनेक बॉलिवूड कलाकरांची नावे भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंसह जोडण्यात आली होती. त्यातील विराट कोहली अनुष्का शर्मा, युवराज सिंग आणि हेजल कीच, जहीर खान आणि सागरिका घाडगे या जोड्या विवाहबंधनात देखील अडकल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 3:53 pm

Web Title: sunil shetty daughter is dating cricketer lokesh rahul avb 95
Next Stories
1 हिरोंच्या गर्लफ्रेंड्समुळे गमावले ३० सिनेमे – मल्लिका शेरावत
2 चीनमध्ये मराठमोळ्या अक्षयच्या ‘त्रिज्या’चा डंका !
3 Article 15 movie review: ‘फर्क बहुत कर लिया, अब फर्क लाएंगे’..
Just Now!
X