भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. नरेंद्र मोदींनी आज वयाच्या ७० व्या वर्षात पदार्पण केले. मोदी हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. जनमानसता त्यांची एक खास प्रतिमा आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींना सर्वपक्षीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान अभिनेता सुनिल शेट्टी याने देखील मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे त्याने व्यायाम करतानाचा एक फोटो पोस्ट करुन मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
सीखने की कोई age नहीं होती, यह कोई आपसे सीखे.. technology से लेकर health-fitness तक आप हमेशा आगे रहे हैं.. सीखते रहे हैँ और हम सबको प्रेरित करते रहे हैं.प्रधामंत्री जी आपके 70वे जन्मदिन पर आपको ढेरों शुभकामनायें और यह रही मेरी तरफ से आपको 70 second plank सलामी! @narendramodi Ji https://t.co/TBOMfw3o3O pic.twitter.com/rka0nIc84O
— Suniel Shetty (@SunielVShetty) September 17, 2020
सुनील शेट्टीने गौतम बुद्धांच्या मुर्तीसमोर व्यायाम करताना एक फोटो शेअर केला आहे. “शिकण्याचं वय नसतं हे तत्वज्ञान तुमच्याकडून शिकायला हवं. तंत्रज्ञानापासून हेल्थ फिटनेटपर्यंत विषय कुठलाही असो नवीन काही तरी शिकण्यासाठी तुम्ही नेहमीच उत्साही असता. शिवाय इतरांना शिकण्यासाठी प्रवृत्त करता. नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला ७० सेकंदांची सलामी” अशा आशयाचं ट्विट करुन सुनिल शेट्टीने मोदींना शुभेच्छा दिला आहेत. अनोख्या पद्धतीने दिलेल्या या शुभेच्छा सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 17, 2020 6:41 pm