26 February 2021

News Flash

सुनील शेट्टीचे मुंबईतील बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क

अनेक कलाकार अभिनयासोबतच इतर व्यवसायातही स्वतःला गुंतवून घेतात

सुनील शेट्टी

बॉलिवूड अभिनेते ज्यांना आपण फक्त मोठ्या पडद्यावरच पाहत आलो आहोत, पण त्यांचे अजून एक वेगळे जग असते. त्या जगाबद्दल आपण नेहमीच अनभिज्ञ असतो. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार अभिनयासोबतच इतर व्यवसायातही स्वतःला गुंतवून घेतात. अशा कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता सुनील शेट्टी. सुनीलने जेवढा वेळ मोठ्या पडद्यावर काम केलं, तेव्हा त्याचे लाखो चाहते होते. पण जेव्हा त्याला काम मिळणं कमी झालं तेव्हा त्याने व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. आता तर जर त्याला एखासा सिनेमा मिळाला तर तो आवर्जुन करतो पण त्यानंतर त्याचं संपूर्ण लक्ष हे व्यवसायाकडेच असते.

Video: ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा हा व्हिडिओ पाहिलात का?

सुनीलचा मुंबईमध्ये रेस्तराँचा व्यवसाय आहे. तो ‘मिसचीफ डायनिंग बार’ आणि ‘क्लब एच २०’ चा मालक आहे. या दोन्ही रेस्तराँकडे त्याचे जातीने लक्ष असतेच. शिवाय हाकिम आलिम याच्या सलॉनमध्ये सुनीलचे ५० टक्के शेअर्स आहेत. न्यूज १८ च्या वृत्तानुसार, सुनीलने त्याचे पैसे अशा पद्धतीने गुंतवले आहेत की, त्याने अनेक छोट्या गोष्टींमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत. त्यामुळे जरी तो व्यवसाय डबगाईला आला तरी त्याला फार मोठे नुकसान सहन करावे लागणार नाही. पण यामुळे त्याला त्याचे लक्ष एकाच जागी न ठेवता अनेक ठिकाणी ठेवावे लागते. पण पॉवर डिस्ट्रीब्युशनमार्फत हे करणं शक्य आहे.

‘सेलिब्रिटी करी डॉट कॉम’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सुनीलचे वार्षिक उत्पन्न हे १०० कोटींच्या जवळपास जाणारे आहे. तो एक अभिनेता आणि व्यावसायिक आहे. पॉपकॉर्न मोशन पिक्चर्स नावाने त्याचे प्रोडक्शन हाऊसही आहे. या प्रोडक्शन हाऊसमधून त्याने ‘रक्त’, ‘भागम भाग’ आणि ‘खेल’ या सिनेमांची निर्मिती केली. याशिवाय ‘आर हाऊस’ नावाचे फॅशन ब्युटिकही सुनील सांभाळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 7:24 pm

Web Title: sunil shetty restaurant and hotel business beside bollywood actor and reality show hosts
Next Stories
1 या सिनेमातून दीपिका- इरफानची जोडी पुन्हा एकत्र
2 ICC Women’s World Cup 2017: सामना पाहण्यासाठी अक्षय कुमार अनवाणी धावत गेला
3 टायगरच्या आई-बाबांसोबत दिशाने घालवला ‘क्वालिटी टाइम’
Just Now!
X