अभिनेता सुनील शेट्टीने एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्याच्या ‘धडकन’ या चित्रपटामुळं तर तो तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला होता. आता त्याचा मुलगा मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्याने तसंच अभिनेता अक्षय कुमारनेही आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन यासंदर्भातली पोस्ट केली आहे.
सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी हा लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मिलन लुथ्रिया दिग्दर्शित ‘तडप’ या चित्रपटात तो दिसणार आहे. या चित्रपटात आहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया प्रमुख भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट एक अनोखी प्रेमकहाणी असल्याचं समजत आहे. या चित्रपटाचं रोमँटिक पोस्टर सुनील शेट्टीचा जवळचा मित्र आणि अभिनेता अक्षय कुमार याने लाँच केलं आहे. तसंच आहाननेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पोस्टर शेअर केलं आहे. हा चित्रपट या वर्षी २४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
या पोस्टरमध्ये आपल्याला जखमी अवस्थेतला आहान तारा सुतारियाला मिठी मारताना दिसत आहे. अर्थात निर्मात्यांनी आहानचा चेहरा पोस्टरमध्ये दाखवलेला नाही. चित्रपटाचं नाव ज्या फाँटमध्ये लिहिलंय ते पाहता या चित्रपटात भरपूर ऍक्शन असणार याचा अंदाज येऊ शकतो. हे पोस्टर लाँच केल्यावर अक्षय कुमारने खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तो म्हणतो, “आहान हा तुझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. मला अजूनही तुझ्या वडिलांच्या सुनील शेट्टीच्या बलवान या पहिल्या चित्रपटाचं पोस्टर आठवतं..आणि आज मी तुझ्या पहिल्या चित्रपटांचं पोस्टर लाँच करत आहे…..हे पोस्टर शेअर करताना आनंद आणि अभिमान वाटत आहे.
#SajidNadiadwala‘s #Tadap *ing @ahan.shetty and @tarasutaria, releasing in cinemas on 24th September!”
View this post on Instagram
आहाननेही हे पोस्टर शेअर करत आपल्याला संधी दिल्याबद्दल आणि आपल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मिलन लुथ्रिया आणि साजिद नादियादवालाचे आभार मानले आहेत. तो म्हणतो, “ये प्यार की ‘तडप’ अब अंजाम तक ले जाएगी…. Thank you #sajidnadiadwala sir for giving me this opportunity and Milan sir for believing in me… #Tadap releasing in cinemas on 24th September”
आहान सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टीव्ह असतो. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपले वेगवेगळे फोटोज, वडील सुनील शेट्टींसोबतचे लहानपणीचे फोटोज तो कायम आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो.
View this post on Instagram
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 2, 2021 12:03 pm