८०-९० चा काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे सनी देओल. संवादफेक कौशल्यामुळे लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याचा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सनी देओल राजकारणात चांगलाच सक्रीय असल्याचं दिसून येतं. कलाविश्वाशी नातं जोडलेल्या सनी देओलविषयी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या पत्नीविषयी फार कमी जणांना माहित असेल, किंबहुना त्यांचे फोटोदेखील फार क्वचितच चाहत्यांनी पाहिले असतील.

देओल कुटुंबामधील धर्मेंद्र, बॉबी, करण, इशा, आहाना हे सर्वांच्याच परिचयाचे आहेत. मात्र, आजवर कधीच सनीच्या पत्नीची झलक कोणत्याही पार्टीत किंवा कार्यक्रमात पाहायला मिळालेली नाही.

सनीच्या पत्नीचे नाव पूजा देओल आहे. ती एक गृहिणी असून, बॉलिवूडच्या कोणत्याही पार्टीमध्ये जात नाही. तसेच ती प्रसारमाध्यमांपासूनही दूर असते. त्यामुळे तिचे फारसे फोटो पाहावयास मिळत नाहीत. सनी – पूजाला करण आणि राजवीर अशी दोन मुलं आहेत. यात करणने कलाविश्वात पदार्पण केलं असून राजवीर मात्र प्रसारमाध्यमांपासून दूर असतो. मध्यंतरी सनीच्या पत्नीचे पूजाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आणखी वाचा- ‘ये ढाई किलो का हाथ…’म्हणणाऱ्या सनी देओलचं खरं नाव माहित आहे का?

‘बेताब’ या चित्रपटाने सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत. पण या अपयशी ठरलेल्या चित्रपटांमधील त्याचे संवाद मात्र आजही त्याच्या चाहत्यांच्या ओठांवर आहेत.