News Flash

इ का… सनी लिओनी शिकतेय भोजपुरी, हा पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

सनी लिओनी

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिचा आगामी चित्रपट ‘कोका कोला’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. ‘कोका कोला’ हा एक विनोदी भयपट असून या चित्रपटासाठी सनीने युपीच्या हिंदी बोली भाषेचे धडे घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर चाहते सनीच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकताच सनीचा या बोली भाषेतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सनी लिओनीने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ‘जेव्हा आपण एखाद्या भूमिकेत पूर्णपणे असतो’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओमध्ये सनी ‘ओय क्या बे? काम कर, मुझे छोड’ असे यूपी बोली भाषेत बोलताना दिसत आहे. सनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांची चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘कोका कोला’ हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती महेंद्र धारीवाला करत आहेत. या चित्रपटात सनी लिओनीसह गेल्या दीड वर्षांपासून रुपेरी पडद्याहून लांब असणारी, बिग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करीमी देखील झळकणार आहे. तसेच ती चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप ठरलेली नाही. परंतु चाहते चित्रपटासाठी फार उत्सुक असल्याचे दिसत आहे.

सध्या सनी मल्याळम चित्रपट ‘रंगीला’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तसेच या चित्रपटातून सनी मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 8:03 pm

Web Title: sunny leone aces the bihari dialect in her latest video avb 95
Next Stories
1 Confirm : टायगर श्रॉफ आणि दिशाचा ब्रेकअप
2 अमिताभ बच्चन यांनी शेअर केला तीन पिढ्यांचा फोटो
3 शनाया करते ‘या’ अभिनेत्याला डेट, पण लग्नाबद्दल म्हणते…
Just Now!
X