17 December 2017

News Flash

सनी लिओनीच्या नवीन कारची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क

अमेरिकेतून घेतलेल्या याच कंपनीच्या दोन गाड्या तिच्याकडे आहेत

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 10, 2017 7:04 PM

बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लिओनीला गाड्यांची फार आवड आहे. तिच्याकडे अनेक बड्या कंपनीच्या लक्झरी गाड्यांचा ताफा आहे. या सगळ्यात आता तिच्या गॅरेजमध्ये आणखीन एक गाडी समाविष्ट करण्यात आली आहे. तिने नुकतीच इटलीची एक प्रसिद्ध लक्झरी कार विकत घेतली आहे. मसेराती कंपनीची घीबील नेरीरीमो (Ghibli Nerissimo) ही कार तिने विकत घेतली आहे. सनीची ही कार तब्बल १.१४ कोटी रुपयांची आहे. तिच्याकडे आधीही याच कंपनीची एक कार होती पण तिने ती कार नवऱ्याला वाढदिवसाची भेट म्हणून दिली. इटलीची सर्वात प्रसिद्ध गाडी म्हणून या कंपनीच्या गाड्यांकडे पाहिले जाते. अमेरिकेतून घेतलेल्या याच कंपनीच्या दोन गाड्या तिच्याकडे आहेत. या गाडी व्यतिरिक्त तिच्याकडे ऑडी ए५ आणि क्वाट्रोफार्टे या गाड्याही आहेत.

Nothing like being home in my sick a%$ whip!!!! Love @maserati "1 of 450"

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांना तिचे आगामी सिनेमे, कार्यक्रम, मालिका याची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन देत असते. तिने या गाडीसोबतचा तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या सनी कामानिमित्त लॉस एन्जेलिसमध्ये आहे. हे वर्ष सनीसाठी जास्तच चांगले असल्याचे दिसते. काही महिन्यांपूर्वी तिने ५ बेडरुमचा बंगला विकत घेतला होता. या बंगल्याची किंमतही कोटींच्या घरात आहे. बंगला विकत घेतल्याची बातमीही तिने सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना दिली होती.

सनी लिओनीने बघता बघता मनोरंजन विश्वात आपलं वेगळे स्थान निर्माण केले. सुरुवातीला ‘पॉर्नपरी’ म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्री आता ‘बेबी डॉल’ म्हणून प्रसिद्ध आहे. तिने पूजा भट्टच्या ‘जिस्म २’ चित्रपटाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी तिला खरी ओळख एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस २’ चित्रपटानेच मिळाली. यातील तिचे ‘बेबी डॉल’ हे गाणे बरेच गाजले होते.

First Published on October 10, 2017 7:04 pm

Web Title: sunny leone buys a maserati ghibli other cars she owns proves she is an enthusiast behind the pretty face