News Flash

सनीनं मेक्सिकोत साजरा केला मुलीचा तिसरा वाढदिवस !

जुलै २०१७ मध्ये सनीनं लातूरमधील निशाला दत्तक घेतलं होतं. मेक्सिकोत तिनं निशाचा वाढदिवस साजरा केला.

'ती जगातील सर्वात सुंदर परी आहे. ' असं म्हणत सनीनं निशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सनी लिओनी सध्या आपल्या कुटुंबियांसोबत मेक्सिकोत सुट्ट्या व्यतीत करत आहे. सनीनं दत्तक घेतलेल्या निशाचा तिसरा वाढदिवस आहे. निशाचा वाढदिवस स्पेशल व्हावा यासाठी सनीनं मेक्सिकोत तिचा वाढदिवस साजरा केला आहे.

‘ती जगातील सर्वात सुंदर परी आहे. माझ्या आयुष्यावर दाटलेल्या काळ्या ढगांचं सावट तिनं आपल्या प्रकाशानं दूर केलं आहे, असं म्हणत सनीनं निशाचा सुंदर फोटो शेअर केला. सनीच्या पतीनं देखील निशाचा फोटो शेअर केला. ‘आमच्या आनंदाचं खरं कारण तुच आहे’, असं म्हणत त्यानं छोट्या निशाला वाढदिवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जुलै २०१७ मध्ये सनीनं लातूरमधील २१ महिन्यांच्या निशाला दत्तक घेतलं होतं. महाराष्ट्रातल्या अनाथ अश्रमातून त्यांनी निशाला दत्तक घेतलं होतं. साधरण दोन वर्षांपूर्वी त्यांनी अनाथ आश्रमाला भेट दिली होती, तेव्हा चिमुकल्या निशाला पाहताचक्षणी ते दोघंही तिच्या प्रेमात पडले. निशाला दत्तक घेण्याचा मानस तेव्हापासून दोघांनी बोलून दाखवला होता. अखेर २०१७ मध्ये सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून निशाला डॅनिअल आणि सनीनं दत्तक घेतलं. निशा समंजस झाली की तिला आपण एक दिवस लातूरला नक्की घेऊन जाऊ असंही डॅनिअल एका मुलाखतीत म्हणाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 4:15 pm

Web Title: sunny leone celebrates daughter nisha kaurs birthday in mexico
Next Stories
1 अमोल कागणेचं आता अभिनय क्षेत्रातही पदार्पण
2 #MeToo : नरेंद्र मोदींनी महिलांच्या बाजूने उभं राहायला हवं – सोना मोहपात्रा
3 Video : रणवीर सिंगला आवडते ही मराठमोळी अभिनेत्री
Just Now!
X