24 February 2021

News Flash

सनी लिओनीने पोस्ट केला किचनमधला ‘हा’ फोटो

हा फोटो सनीने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केला आहे

पॉर्नपटांना अलविदा करत बॉलिवूडमध्ये कमी काळात जम बसविलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या बळावर तिने इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान भक्कम केले आहे. विशेष म्हणजे चाहत्यांमध्येही तिची लोकप्रियता अफाट आहे. सनी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे सांगत असते.

नुकताच सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर किचनमधील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत सनीने ‘मी जेवण बनवते, काय शिजतय बघा’ असे तिने कॅप्शन दिले आहे. दरम्यान या फोटोमध्ये सनी अत्यंत क्यूट आणि सुंदर अंदाजात दिसत आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सनी लवकरच ‘कोका कोला’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती महेंद्र धारीवाला करत आहेत. काही दिवसांपूर्वी सनीचा या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानचा डी-ग्लॅम लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या चित्रपटात सनी लिओनीसह गेल्या दीड वर्षांपासून रुपेरी पडद्याहून लांब असणारी, बिग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करीमी देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप ठरलेली नाही. परंतु चाहते चित्रपटासाठी फार उत्सुक असल्याचे दिसत आहे. सध्या सनी मल्याळम चित्रपट ‘रंगीला’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तसेच या चित्रपटातून सनी मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 11:31 am

Web Title: sunny leone cooking food in kitchen avb 95
Next Stories
1 सलमानच्या मेहुण्यासोबत बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीचा डेब्यू
2 “तू एका आईचे मन दुखावले आहेस”; वीणाच्या आईने शिवानीला सुनावले
3 मालदीवच्या किनाऱ्यावर मलायकाचा सुपर हॉट लूक; पाहा फोटो
Just Now!
X