बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या चित्रपटांमुळे कायम चर्चेत असते. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांची मने जिंकत असते. नुकताच सनीने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे अनेकांची मने जिंकली आहेत.

सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिचा आगामी चित्रपट ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटातील गाण्याचा आहे. या गाण्यामध्ये सनी अत्यंत सुंदर दिसत आहे. तिने नऊवारी साडी नेसली असून केसात गजरा माळला आहे. हे गाणे जवळपास दिड लाख लोकांनी आतापर्यंत पाहिले आहे.

a cloth seller told foreigner how to sell clothes funny video goes viral
“एकसो पचास मे दो….” कापड विक्रेत्याने फॉरेनरला शिकवले की कपडे कसे विकायचे…
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल
Jugaad Video
चावी न वापरता सुरू करता येईल स्कुटी! अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक्, पाहा व्हिडीओ
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनीने इन्स्टाग्रामवर चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ शेअर करत ‘हो आली रे आली.. मराठी मुलगी आली’ असे कॅप्शन देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटातील सनीचे हे गाणे गायिका श्रेया घोशालने गायले आहे.

‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात सनी लिओनीसोबत अभिनेता अर्जुन रामपाल, दिगांगना सूर्यवंशी आणि कृष्णा अभिषेक दिसणार असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरमादेवी’मध्ये दिसणार आहे.