News Flash

वडिलांना पाहून धावत जाऊन मारली मिठी, सनीची मुलगी निशाच्या व्हिडीओने जिंकली अनेकांची मने

सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

(Photo Credit: Viral bhayani video)

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीची मुलगी निशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ विमानतळावरील आहे. या व्हिडीओमध्ये निशा वडिल डॅनियल वेबरला पाहून पळत त्यांच्याकडे जाते आणि त्यांना मिठी मारते. दरम्यान सनी लिओनी आणि तिची दोन मुले नोह आणि अशर देखील तेथे उपस्थित असल्याचे पाहायला मिळते.

सनी लिओनी गेल्या काही दिवसांपासून ‘एमटीवी स्प्लिट्सविला १३’चे चित्रीकरण केरळमध्ये करत होती. त्यावेळी तिची तिन्ही मुले तिच्यासोबत होती. गुरुवारी संध्याकाळी सनी मुंबईत परतली आहे. दरम्यान विमानतळावर सनीचा पती डॅनियल वेबर त्यांची वाट पाहात असतो. वडिलांना विमानतळावर पाहून निशा आनंदी होते. ती पळत त्यांच्याकडे येते आणि त्यांना मिठी मारते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

बाप-लेकीचा हा विमानतळावरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. डॅनियल आपल्या मुलांना भेटण्यासाठी गुडघ्यावर बसला असल्याचे दिसत आहे. निशा पळत येऊन त्याला मिठी मारते. त्यावेळी ती आनंदी असल्याचे दिसत आहे. त्यानंतर निशाचे दोन्ही भाऊ देखील वडिलांना मिठी मारतात. पण निशाचे हसणे आणि बोलणे पाहून सर्वांना आनंद झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. २०१७मध्ये सनी लिओनी आणि डॅनियलने निशाला दत्तक घेलते. त्यानंतर नोह आणि अशर यांचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. सनी आणि डेनियल तिन्ही मुलांसोबत नेहमी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 1:44 pm

Web Title: sunny leone daughter nisha hugs daddy daniel cutest video currently winning hearts avb 95
Next Stories
1 बेबी बंपसोबत लिसाचा डान्स व्हायरल, प्रेग्नंसीमध्ये करतेय वर्कआउट
2 जान्हवीच्या ‘या’ ड्रेसची किंमत एकून व्हाल थक्क!
3 ‘आपल्या दोघात तिसरी’, सोशल मीडिया पोस्टद्वारे सखी-सुव्रतने दिली आनंदाची बातमी
Just Now!
X