28 January 2021

News Flash

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

आपल्या बोल्ड, मादक अदांनी घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या तमाम चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सनीला रुग्णालायतून डिस्चार्ज मिळाला आहे.

सनी लिओनी

आपल्या बोल्ड, मादक अदांनी घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या तमाम चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सनीला रुग्णालायतून डिस्चार्ज मिळाला असून लवकरच ती पुन्हा कामावर रुजू होणार आहे. स्पिलट व्हिला ११ च्या शूटिंगसाठी सनी लिओनी सध्या उत्तराखंडमध्ये आहे. गुरुवारी अचानक सनीला पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यामुळे तिला उत्तराखंडच्या उधम सिंह नगरातील ब्रिजेश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

डॉ. मयांक अग्रवाल यांनी सनी लिओनीवर उपचार केले. सनीला जेव्हा रुग्णालयात आणले तेव्हा तिच्या अंगात सौम्य ताप होता आणि पोटात दुखत होते. औषधे सुरु केल्यानंतर तिचा पोटदुखीचा त्रास बंद झाला. सनीच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाल्यामुळे शुक्रवारी दुपारी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

सनी आता हॉटेलवर परतली असून तिला काही दिवस विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे असे सनीच्या प्रवक्त्याने सांगितले. स्पिलट व्हिला या रिअॅलिटी शो मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन दिवसात आम्ही सनीची आवश्यकता नसलेल्या भागांचे चित्रीकरण आटोपून घेणार आहोत. सोमवारपासून सनी पुन्हा चित्रीकरणात सहभागी होईल अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 3:06 pm

Web Title: sunny leone discharged from hospital
टॅग Sunny Leone
Next Stories
1 IIFA 2018 : आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी रेखा बँकॉकमध्ये दाखल
2 ‘या’ कारणामुळे सलमानने मानले चाहत्यांचे आभार!
3 आजारपणाला कंटाळलेल्या इरफानला शाहरुख करतोय अशी मदत
Just Now!
X