News Flash

बायोपिकमध्ये भूमिका साकारल्यानंतर अजूनही मानसिक तणावात – सनी लिओनी

परदेशात शालेय जीवनात आलेल्या अडचणी, त्यानंतर घरातील आर्थिक परिस्थितीमुळे अॅडल्ट स्टार म्हणून करावे लागलेले काम याबाबत दाखविण्यात आले आहे.

सनी लिओनी

बॉलिवूडमधील अभिनेत्री सनी लिओनी कायमच वेगवेगळ्या गोष्टींवरुन चर्चेत असते. सध्या ती तिच्या काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘करनजीत कौर; अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या वेबसिरीजवरुन चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या वेबसिरीजवरुन तिला अनेक उलट-सुलट प्रश्न विचारले जात आहेत. बायोपिक होता तर तू स्वत:च त्यामध्ये काम का केले हा तिला सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न आहे. तुझी आता असणारी प्रतिमा सुधारण्यासाठी तू हा प्रयोग केला आहेस का असे विचारले असता ती म्हणते लोक माझ्याबाबत काय विचार करतात मला माहित नाही, पण या चित्रपटात सत्य घटना दाखविण्यात आल्या आहेत.

या वेबसिरीजबाबत सांगताना ती म्हणते, नमाह फिल्मसचे शरीन मंत्री आणि माझे पती डॅनियल वेबर यांनी मला या वेबसिरीजबाबत सांगितले. सुरुवातीला मी माझ्या आयुष्यातील जुन्या गोष्टींवर काम करण्यास तयार नव्हते. मात्र या दोघांनीही मला याबाबत नीट पटवून दिल्याने अखेर मी तयार झाले. या वेबसिरीजमधील विविध प्रसंग शूट करणे हा माझ्यासाठी वाटतो तितका सोपा टास्क नव्हता. दुसऱ्या सिझनच्या शूटींगमुळे मी अधिकच तणावात होते, त्या तणावातून मी अजून बाहेर पडलेले नाही. माझ्या आयुष्यातील निर्णय मीच घेतले आहेत. त्यावेळी मी आयुष्यात जे निर्णय घेतले तेव्हा मी पुरेशी प्रगल्भ नव्हते. माझ्या वागण्याचा माझे कुटुंबिय आणि नातेवाईक यांच्यावर काय परिणाम होईल याचा मी विचार केला नव्हता.

या बायोपिक वेबसिरीजमध्ये सनीचा अॅडल्टस्टारपासून बॉलिवूडमधील एन्ट्रीपर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे. सनीच्या आयुष्याशी निगडित सगळे पैलू यामध्ये उलगडून दाखविण्यात आले आहेत. परदेशात शालेय जीवनात आलेल्या अडचणी, त्यानंतर घरातील आर्थिक परिस्थितीमुळे अॅडल्ट स्टार म्हणून करावे लागलेले काम याबाबत दाखविण्यात आले आहे. यामध्ये सनी अतिशय सुंदर दिसली असून त्यातील तिचे ‘इट्स हॉट’ हे गाणे चांगलेच गाजत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 11:10 am

Web Title: sunny leone gives answers to questions about her biopic karanjeet kaur the untold story of sunny leone
Next Stories
1 प्रियांकाऐवजी कतरिनाचीच निवड ‘भारत’साठी योग्य होती कारण…..
2 ‘ललित २०५’मधून घेतला जाणार नात्यांमधील हरवलेल्या संवादाचा शोध
3 ‘तू चिडला आहेस का, श्रीदेवीचे अखेरचे शब्द आजही आठवतात’
Just Now!
X