News Flash

Video : सनी लिओनीचा हॉट लूक आता नेपाळी गाण्यातही

हा चित्रपट जगभरात १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे

पॉर्नपटांना अलविदा करत बॉलिवूडमध्ये कमी काळात जम बसविलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या बळावर तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनीचा चाहता वर्गदेखील प्रचंड मोठा आहे. आता सनी तिचा जलवा नेपाळी चित्रपटामध्ये ही दाखवणार आहे.

सनीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सनीने ती ‘पासवर्ड’ या नेपाळी चित्रपटातील एका गाण्यात झळकणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान हा चित्रपट जगभरात १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तिने ट्विटमध्ये ‘एबीइंटरनॅशनल८’ आणि ‘अमितबस्नेट’ यांचे आभार मानले आहेत.

सनी लवकरच ‘कोका कोला’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती महेंद्र धारीवाला करत आहेत. काही दिवसांपूर्वी सनीचा या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानचा डी-ग्लॅम लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या चित्रपटात सनी लिओनीसह गेल्या दीड वर्षांपासून रुपेरी पडद्याहून लांब असणारी, बिग बॉस फेम अभिनेत्री मंदाना करीमी देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप ठरलेली नाही. परंतु चाहते चित्रपटासाठी फार उत्सुक असल्याचे दिसत आहे.

सध्या सनी मल्याळम चित्रपट ‘रंगीला’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तसेच या चित्रपटातून सनी मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 12:07 pm

Web Title: sunny leone is going to play role in nepali movie password avb 95
Next Stories
1 कियाराच्या या छोट्या बॅगची किंमत माहितीये का ?
2 सुषमा स्वराज यांच्या आठवणीने बॉलिवूडही हळहळले
3 #MeToo : लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या व्यक्तीसोबत काम करणार नाही – दीपिका
Just Now!
X