बॉलिवूडची बेबी डॉलने म्हणजेच सनी लिओनीने काहीही केलं आणि त्याची बॉलिवूडमध्ये चर्चा झाली नाही असं होणं कठीणच. नुकतेच तिने जनावरांसाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ संस्थेसोबत मिळून एक कॅलेंडर लॉन्च केले आहे. या कार्यक्रमावेळी तिने मांसाहार सोडून शाकाहार का स्वीकारला. तसेच यामुळे तिच्या आयुष्यात काय बदल झाले यावर प्रसारमाध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

Gurugram Gangrape: नरेंद्र मोदींना टॅग करुन अरिजीत सिंगने विचारले, कसे रोखणार बलात्कार?

अनेकांना मांसाहारपासून शाकाहारी बनणं तसं फार कठीण वाटतं पण माझ्याबाबतीत तसं काही झालं नाही. उलट शाकाहारी बनणं फार सोप्पं असल्याचं तिने सांगितले. एवढंच नाही तर खास वजन कमी करावे म्हणून काही शाकाहारी झाले नसून, उलट जेव्हापासून शाकाहारी झाले तेव्हापासून वजन कमी व्हायला सुरूवात झालं अशी कबूली सनीने दिली.

जर तुम्हाला मनापासून शाकाहारी व्हायचे असेल तर तुम्ही मांसाहारांचे शिकार होणाऱ्या जनावरांच्या वेदना दाखवणारे व्हिडीओ पाहा. तुम्ही ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाच मांसाहार करावासा वाटणार नाही, असे सांगत सनीनं जनावरांप्रती आपलं प्रेम व्यक्त केले. सनी लिओनीला गेल्या वर्षी ”पेटा पर्सन ऑफ द इअर” हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

मराठीचा नटसम्राट आणि साऊथचा थलायवा दिसणार एकाच सिनेमात

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सनी आणि तिचा पती डॅनियल वेबर हे एका कार्यक्रमासाठी लातूरला गेले होते. त्यावेळी तेथून परतताना तिच्या खासगी विमानाचा अपघात झाला होता. पण या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं ट्विट तिने केले होते. खराब हवामानामुळे विमानाची दिशा भरकटली होती. पण, वैमानिकाने सतर्कता बाळगल्याने मोठा अपघात टळला होता.