बॉलिवूडची बेबी डॉल अभिनेत्री सनी लिओनी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सनीही तिच्या खासगी तसेच व्यावसायिक आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करते. फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून ती सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तिथून ती अनेकदा फोटो आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करत असते. सध्या सनी दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तेथूनच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.

पती डॅनिअल वेबरबरोबर दुबईमध्ये असणाऱ्याने सनीने स्वीमींग पूलजवळ उभा असणाऱ्या स्वत:चा एका फोटो इन्स्ताग्रामवर पोस्ट केला आहे. डोळ्यावर काळी टोपी, मोकळे सोडलेले केस, डोळ्यांवर सनग्लासेस आणि मोनॉकिनीमध्ये सीन या फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोला तिने केवळ ‘लव्ह दुबई’ एवढीच कॅप्शन दिली आहे.

 

View this post on Instagram

 

Love Dubai!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनीचा हा लूक पाहून तिचे अनेक चाहते घायाळ झाल्याचे कमेंटमधून दिसून येत आहे. अनेकांनी तिच्या या फोटोवर हार्ट इमोन्जी टाकून रिअ‍ॅक्ट केले आहे. १३ लाखहून अधिक चाहत्यांनी या फोटोवर लव्ह असे रिअ‍ॅक्ट केलं आहे.

या आधीही तिने दुबई ट्रीपमधील अनेक फोटो इन्स्ताग्रामवरुन पोस्ट केले आहेत. यामध्ये एका फोटोमध्ये सनी पती डॅनिअलबरोबर पांढऱ्या रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये असल्याचे दिसत आहे. याशिवाय तिने स्वीमींग पूलमधीलही काही फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

Last one of pool/water time. It looks like a postcard!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी आणि डॅनिअलने २०११ साली लग्न केले असून त्यांना तीन मुलं आहेत. दोन २१ जून २०१७ रोजी सनी आणि डॅनिअलने महाराष्ट्रातील लातूर येथून अवघ्या आठ महिन्यांच्या निशाला दत्तक घेतलं होतं. सरोगसीद्वारे २०१८ साली तिने जुळ्या मुलांना दिला. अशर आणि नोहा असं या मुलांचे नाव ठेवले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी ने ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात सनीने एक आयटम साँग केले होते. ती लवकरच कोकाकोला या विनोदी भयपटामध्ये दिसणार असून लवकरच ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रवेश करणार असून ‘विरामढवी’ हा तिचा पहिला चित्रपट ठरणार आहे.