अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि जया बच्चन यांच्यासोबत तिचं शाब्दिक द्वंद्व सुरु आहे. या वादात आता तिने अभिनेत्री सनी लिओनीला देखील ओढलं आहे. “सनी लिओनीला स्विकारणाऱ्यांना पॉर्नस्टार हा शब्द आता अश्लिल वाटू लागलाय”, असा उपरोधिक टोला तिने टीकाकारांना लगावला आहे.

“सनी लिओनीसारखे कलाकार आदर्श नसावेत अशी भूमिका मांडणाऱ्या एका लेखकाला या मंडळींनी शांत केलं होतं. अॅडल्ड इंडट्रीमधून आलेल्या सनी लिओनीला एक कलाकार म्हणून त्यांनी स्विकारलं. अन् आता पॉर्नस्टार हा शब्द त्यांना अश्लिल वाटू लागलाय. याला बनावटी स्त्रीवाद म्हणतात.” अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

abdul karim tunda acquitted in 1993 serial blasts case
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष मुक्त
Siddhant Chaturvedi said Ranbir Kapoor and Alia Bhatt texted him after Gehraiyaan flopped
दीपिका पादुकोणबरोबरचा चित्रपट फ्लॉप झाल्यावर रणबीर-आलियाने केलेला सिद्धांत चतुर्वेदीला मेसेज; अभिनेता म्हणाला…
Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?

यापूर्वी ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री असं म्हटलं होतं. “उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर त्यांना तिकिट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकिट मिळू शकतं.” अशी टीका तिने केली होती. या टीकेमुळे बॉलिवूड विरुद्ध कंगना असा सुरु असलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.