26 September 2020

News Flash

फिल्म रिव्ह्यू : हास्यास्पद करमणूक

सनी लिओनी हिला ‘हिरोईन’ बनविणारा हा चित्रपट आहे. ‘पोर्नस्टार’ अशी प्रतिमा असल्यामुळे मुख्य भूमिका असूनही चित्रपटकर्त्यांनी सनी लिओनीला ‘पोर्नस्टार’ म्हणूनच चित्रपटात सादर केले आहे.

| April 12, 2015 12:38 pm

हिंदी चित्रपट म्हणजे फॉर्म्यूलेबाज करमणुकीचा उत्तम नमुना ठरतो हे वारंवार सिद्ध करणारे चित्रपट हमखास झळकतात, थोडय़ाफार प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवितात आणि मग विसरले जातात. अशा तद्दन चित्रपटांची यादी भलीमोठीच असते. ‘एक पहेली लीला’ या चित्रपटाचाही असा ठरीव फॉर्म्यूला आहे. rv14सनी लिओनी हिला ‘हिरोईन’ बनविणारा हा चित्रपट आहे. ‘पोर्नस्टार’ अशी प्रतिमा असल्यामुळे मुख्य भूमिका असूनही चित्रपटकर्त्यांनी सनी लिओनीला ‘पोर्नस्टार’ म्हणूनच चित्रपटात सादर केले आहे. करमणूक पण हास्यास्पद पटकथा, अभिनयाचा संपूर्ण अभाव आणि निव्वळ अंगप्रदर्शन असा हा चित्रपट आहे. ‘बी ग्रेड’ स्वस्त करमणुकीच्या चित्रपटांची लाट पुन्हा बॉलीवूडमध्ये आणून गल्लापेटीवर डोळा ठेवण्याचा एककलमी कार्यक्रम चित्रपटकर्त्यांनी या चित्रपटाद्वारे राबविला आहे.
नायिकेची दोन नावे, दोन रूपे यात आहेत. एक आहे ती सुपर मॉडेल मीरा. जी आजच्या काळातील आहे आणि मिलान शहरात राहते. तिचे आई-वडील म्हणजे विमान दुर्घटनेत मरण पावले म्हणून तिला विमान प्रवासाचे प्रचंड भय असते. फॅशनच्या कसल्यातरी ‘फोटो शूटिंग’साठी तिला भारतात यावे लागते. विमान प्रवासाच्या भयामुळे मीराची मैत्रीण राधिका म्हणजेच ‘रॅड्स’ तिला विमानतळ अशी ‘थीम’ असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जातोय असे सांगून भारतात जाणाऱ्या विमानात बसवते आणि मग थेट राजस्थानात घेऊन येते. मीरा आजच्या काळातील तरुणी असून तिचे पूर्वसंचित म्हणून ती राजस्थानात येते. तीनशे वर्षांपूर्वी तिचे नाव लीला असते. राजस्थानमधील राजेशाही ‘हवेली’, संस्थानिक, त्यांचे प्रेम असा सगळा मामला आणि राजस्थानात आल्यावर मीरा तिच्या मनातील येईल तेव्हा नाचत सुटते. त्यामुळे पडदाभर भयंकर गडद रंगांचे समूह नृत्य आणि मीराच्या अंगप्रदर्शनाची ‘क्लोजअप’ दृश्ये याची रेलचेल चित्रपटभर सुरू राहते. फॅशन मॉडेल मीरा असो की ३०० वर्षांपूर्वीची लीला असो नायिकेच्या कपडय़ांमध्ये तसूभरही फरक दाखविलेला नाही. आजची मॉडेल म्हणून कमीत कमी कपडय़ात मीरा वावरते तर प्राचीन काळातील लीला हीसुद्धा ‘बॅकलेस’ चोळीमध्ये वावरताना दाखविली आहे.
पूर्वजन्मातील लीला आणि श्रवण ३०० वर्षांनंतर करण आणि मीरा म्हणून अवतरतात आणि पूर्वजन्मातील भैरो या खलनायकाला या जन्मातील करण संपवून टाकणार आहे. पण करणला आजच्या काळातील भैरो कोण आहे ते मात्र माहीत नाही. ते रहस्य चित्रपट उलगडतो. पूर्वजन्मात अधुरी राहिलेली प्रेमकहाणी वर्तमानातील या जन्मात पूर्ण होते अशा पद्धतीचे तद्दन हिंदी सिनेमावाल्यांच्या डोक्यातील कल्पना यावर चित्रपट आधारित आहे.
सनी लिओनीला प्रथमच दोन व्यक्तिरेखा सादर करणाऱ्या नायिकेची प्रमुख भूमिका मिळाली असली तरी तिने अभिनय करावा अशी चित्रपटकर्त्यांचीच अपेक्षा हा चित्रपट करताना नसावी. किंबहुना नायिकाच काय नायिकेकडे आकर्षित होणाऱ्या सर्व पुरुष व्यक्तिरेखांसाठीही दिग्दर्शकाने अतिशय ‘ठोकळे’ नट आणले आहेत. त्यातल्या त्यात करण या भूमिकेतील जय भानुशाली हा मूळचा टीव्ही कलावंत असल्यामुळे बेतास बात अभिनय करतो. सनी लिओनीचे अंगप्रदर्शन, कामसूत्रसदृश हालचालींचे ‘क्लोजअप’ दृश्य यावरच सगळा भर दिल्यामुळे अभिनय येत नसलेल्या कलावंतांनाच काम द्यायचे ही जणू चित्रपटकर्त्यांची पूर्वअट असावी.
‘केसरीया बालम’ आणि ‘ढोली तारो’ या जुन्या गाजलेल्या गाण्यांवर भिस्त ठेवून संगीतकारांनी राजस्थानी लोकसंगीतातील चालींवर गाणी केली आहेत.
जुन्या ओळखीच्या चालींवरची गाणी असल्यामुळे ती ऐकायला बरी वाटतात एवढेच काय ते. निव्वळ सनी लिओनीचे अंगप्रदर्शन दाखविणारा हा चित्रपट निव्वळ हास्यास्पद करमणूक न ठरला तरच नवल.

एक पहेली लीला

निर्माते – भूषण कुमार, क्रिशन कुमार, अहमद खान, शायरा खान
दिग्दर्शक – बॉबी खान
छायालेखक – बशालाल सय्यद
पटकथा – जो जो खान
संवाद – बंटी राठोड
संगीत – मीट ब्रॉस अंजान, अमाल मलिक, डॉ. झिअस, टोनी कक्कर,  उझैर जयस्वाल
कलावंत – सनी लिओनी, जय भानुशाली, रजनीश दुग्गल, मोहीत अहलावट, राहुल देव, जस अरोरा, शिवानी टांकसाळे, अजय घुवालेवालास, चेतन अग्रवाल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 12:38 pm

Web Title: sunny leone leela a laughable entertainment
टॅग Sunny Leone
Next Stories
1 चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शाहिरी जलसा
2 ‘कोर्ट’वर पारितोषिकांचा वर्षांव
3 सुपरहिरो चित्रपट मालिकांची निर्मिती अधिक आव्हानात्मक
Just Now!
X