24 January 2019

News Flash

कठुआ बलात्कारप्रकरणी धास्तावलेल्या सनीने मुलीसाठी लिहिली भावनिक पोस्ट

प्रत्येक वाईट गोष्टीपासून मी तुझं रक्षण करेन, असं वचन तिने या पोस्टद्वारे आपल्या मुलीला दिलं आहे.

सनी लिओनी

कठुआ बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ देशभरात ठिकठिकाणी निदर्शने होत असतानाच बरेच कलाकारसुद्धा रस्त्यावर उतरले होते. सोशल मीडियावरही अनेकांनी निषेध नोंदवला. या घटनेने धास्तावलेल्या सनी लिओनीनंही आपली मुलगी निशासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. प्रत्येक वाईट गोष्टीपासून मी तुझं रक्षण करेन, असं वचन तिने या पोस्टद्वारे आपल्या मुलीला दिलं आहे.

आपल्या कुशीत घेतलेल्या निशाभोवती सनीने तिचं जॅकेट पांघरल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सनीनं निशाभोवती जणू काही संरक्षण कवच बांधल्याचा आभास हा फोटो पाहताना होतो. ‘या जगातल्या प्रत्येक वाईट व्यक्ती आणि वाईट गोष्टींपासून मी तुझं रक्षण करण्याचं वचन देते. तुझ्या संरक्षणासाठी मला माझे प्राण जरी गमवावे लागले तरी चालेल. विकृत आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून प्रत्येक मुलीचं रक्षण केलं पाहिजे, त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल,’ अशी पोस्ट तिने या फोटोसोबत लिहिली आहे.

वाचा : ‘त्यांना’ फाशी देण्यासाठी जल्लाद होण्यासही तयार, आनंद महिंद्रांची संतप्त प्रतिक्रिया

कठुआमध्ये एका आठ वर्षांच्या मुलीवर मंदिर परिसरातच सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याची भीषणता समाजासमोर आली आणि अनेकांनी आपला संताप व्यक्त केला. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटींनी या घटनेचा निषेध करताना आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

First Published on April 16, 2018 2:08 pm

Web Title: sunny leone makes a promise to her daughter in the wake of kathua outrage shares a post