बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला बीबीसीच्या १०० प्रतिभावान महिलांच्या यादीत स्थान मिळाले आहे. सनीसोबतच या यादीत अजून चार भारतीय महिलांचाही समावेश आहे. या यादीत महिला उद्योजिका, इंजीनिअर, फॅशन अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा या यादीत समावेश आहे.

सनी लिओनी गेल्या पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ती २०११ मध्ये बिग बॉस या विवादास्पद रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. यानंतर तिच्यासाठी बॉलिवूडची दारं उघडी करण्यात आली. बिग बॉसनंतर तिने ‘जिस्म २’, ‘जॅकपॉट’ आणि ‘एक पहेली लीला’ यांसारख्या सिनेमात काम केले.

१०० प्रतिभावान यादीत सनी लिओनीसोबत ज्या चार भारतीय महिलांचे नाव सहभागी झाले आहे. गौरी चिंदारकर (महाराष्ट्र), मल्लिका श्रीनिवासन (चेन्नई), नेहा सिंग (मुंबई) आणि सालूमरदा थिमक्का (कर्नाटक) यांचे नाव सहभागी झाले आहे.

दरम्यान, सनी लिओनीचे जसे जगभरात चाहते आहेत. त्यातला एक म्हणजे ओसामा बिन लादेन हाही होता. सनी लिओनीच्या आयुष्यावर एक लघुपट बनत आहे. या लघुपटाचे नाव आले ‘मोस्टली सनी’. दिग्दर्शक दिलीप मेहता सध्या या लघुपटावर काम करत आहेत. या लघुपटात सनीच्या आयुष्याशी जोडल्या गेल्याने अनेक घटनांचा उलघडा होणार आहे. नुकताच ‘मोस्टली सनी’ या लघुपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर तिच्या या लघुपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये अजूनच उत्सुकता वाढली आहे. सनी लिओनीच्या या लघुपटात असा खुलासा करण्यात आला आहे की कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन हा तिचा चाहता होता. पाकिस्तान इथल्या एबटाबाद येथे जेव्हा अमेरिकी सैन्याने ओसामाला ठार मारले होते, तेव्हा ओसामाच्या जवळ सनी लिओनीच्या सिनेमांच्या व्हिडिओ सीडी असण्याची गोष्ट पुढे आली होती.