अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी होणार की, ‘अमेरिकन ड्रीम’ म्हणजे सर्वसमावेशक अमेरिकेची खंडित परंपरा पुढे नेणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व माजी उपाध्यक्ष जो बायडेन बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. दरम्यान या निवडणूकीत बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने देखील मतदान केलं. मतदान केल्यानंतर तिने आपल्या पतीसोबत एक फोटो शेअर केला. “कोण विजयी होणार? हा सप्सेंस आता माझा जीव घेईल.” असं म्हणत तिने शेअर केलेला हा फोटो सध्या भारतीय नेटकऱ्यांमध्ये चर्चेच आहे.

अवश्य पाहा – ‘गोव्याला पॉर्न डेस्टिनेशन करायचं आहे का?’; त्या व्हिडीओप्रकरणी पूनम पांडे विरोधात तक्रार

 

View this post on Instagram

 

The suspense is killing me!!! @dirrty99

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

अवश्य पाहा – ‘अमराठी व्यक्तीसाठी मराठी भय्ये नेते का बोंबलतायेत?’; महेश टिळेकर यांचा सवाल

सनी लिओनी ही बॉलिवूड सिनेसृष्टीत जरी काम करत असली तरी देखील ती मुळची अमेरिकन नागरिक आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ती भारतात येते. दरम्यान हॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांनी मतदान केल्यानंतर स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या सर्वांमध्ये सनी लिओनीचा फोटो मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मी मतदान केलं आहे असं लिहिलेला बिल्ला लावून तिने हा फोटो शेअर केला. तिचा हा फोटो विशेत: भारतीय नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे.

भारतीय वंशाच्या मतदारांची ताकद

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार एक मोठी भूमिका बजावणार असल्याचं म्हटलं जात आहे. १६ राज्यांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या अमेरिकेतील नागरिकांपेक्षाही अधिक आहे. परंतु १३ लाख भारतीय त्या आठ राज्यांमध्ये राहतात ज्या ठिकाणी चुरशीची लढत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही पक्षाला एक मतही बहुमोल ठरणार आहे. अमेरिकेत २८ ऑक्टोबरपर्यंत ७.५ कोटींपेक्षा अधिक मतं देण्यात आली आहेत. राजकीय क्षेत्रातील जाणकारांनुसार यावेळीही याप्रकारचे ‘सायलेंट वोटर’च ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेत मतदानासाठी मेल किंवा लवकर मत देणं आणि दुसरं मतदान केंद्रांवर जाऊन मत देणं असे पर्याय उपलब्ध आहेत.