News Flash

खऱ्या पुरुषाने काय करायला हवं?; सनी लिओनी म्हणाली…

सनीने नवऱ्याचं केलं कौतुक

आपल्या बोल्ड अंदाजाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. सनीने लिहलेली ही पोस्ट तिचा नवरा डॅनिअलसाठी आहे. या पोस्टमध्ये सनीने डॅनिअलचं कौतुक करतं पुरुषांनी महिलांसाठी काय करणं गरजेचं आहे हे सांगितलं आहे.

सनी लिओलीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. शिवाय यात एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. ज्यात ती रात्रीच्या वेळी रस्त्या शेजारी गाडीत थांबली आहे. सनीने तिच्या पोस्टमध्ये म्हंटल आहे. ”डॅनिअलसोबत काल रात्री क्यूट डिनर डेट झाली आणि रात्रीच्या शेवटी त्याने थांबून एका एकट्या असलेल्या महिलेला गाडीचा टायर बदलण्यासाठी मदत केली. खरा जंटलमन” अशी पोस्ट लिहत सनीने नवऱ्याचं कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीतून खऱ्या पुरुषांनी कसं वागायला हवं हे तिच्या चाहत्यांना सांगितलं. “खऱ्या पुरुषाने काय करायला हवं? अशा महिलेची मदत जी एकटी होती. जिला तिच्या गाडीच्या टायरची हवा गेल्याने तो बदलण्यासाठी मदत हवी होती. चांगली मदत..डॅनिअल लव्ह यू.” अशी पोस्ट करत तिने डॅनिअलचा गर्व असल्याचं म्हंटलं आहे.
याआधी देखील सनीने अनेकदा डॅनिअलचं कौतुक केलं आहे. प्रत्येक कठीण परिस्थितीत डॅनिअलने साथ दिल्याचं तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.

सनी लिओनी सध्या ‘स्प्लिटस् व्हीला’ या शोचं सूत्रसंचालन करतेय. तर नुकताच तिने आगामी सिनेमा ‘शेरा’चं टीझर शेअर केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 11:03 am

Web Title: sunny leone post what should real men do proud her husband kpw 89
Next Stories
1 Holi 2021: ‘रंग बरसे’ ते ‘बलम पिचकारी’, रंगाची उधळण करताना बेभान करणारी गाणी
2 ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील लतिकाचा ‘वाथी कमिंग’ डान्स पाहिलात का? व्हिडीओ चर्चेत
3 ‘नाकातून रक्त काढून दाखवा ना’, आण्णा नाईक ते स्वप्नील जोशी कलाकारांनी सांगितले आवडते मीम
Just Now!
X