‘न्युयॉर्क फॅशन वीक’मध्ये यंदा भारतीय भरणा पाहायला मिळाला. बी टाऊनची ‘ग्लोबल आयकॉन’ प्रियांका चोप्रा आणि सनी लिओनी यांनीही यंदाच्या ‘न्युयॉर्क फॅशन वीक’मध्ये हजेरी लावली होती. ‘न्युयॉर्क फॅशन वीक’च्या रॅम्पवर चालणारी सनी लिओनी ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे. फॅशन डिझायनर अर्चना कोच्चरच्या डिझाईन्स सादर करण्यासाठी सनी रॅम्पवर उतरली होती. दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही या सोहळ्याला हजेरी लावली होती.
‘क्वांटिको’स्टार प्रियांका चोप्रा आणि सनी लिओनी यांनी न्युयॉर्कमध्ये एकमेकींसोबत काही वेळ घालवला. सनीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रियांकासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सनी आणि प्रियांका एकत्र दिसत असलेल्या या फोटोला सनीनो एक सुंदर कॅप्शनही दिले होते. सनीने या कॅप्शनमध्ये प्रियांकाला ‘डॉल’ असे म्हटले आहे. त्यामुळे बी टाऊनच्या ‘बेबी डॉल’ला ‘पिगी चॉप्स’च्या रुपाने एक नवी दुसरी ‘डॉल’ मिळाली आहे असेच म्हणावे लागेल. प्रियांकाच्या यशाबद्दल सनी नेहमीच उत्सुक दिसते हे तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन कळतं. यापूर्वीही प्रियांकाच्या ‘बेवॉच’ या चित्रपटाची बातमी येताच ‘देसी गर्ल’ला शुभेच्छा देणाऱ्या कलाकारांमध्ये सनी पुढे होती. या चित्रपटासाठीची उत्सुकताही सनीने तिच्या पोस्टमधून व्यक्त केली होती.

वाचा: प्रियांका चोप्राला सुद्धा हवे ‘रिलायन्स जिओ’?

प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘क्वांटिको’ या सिरीजच्या दुसऱ्या भागाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. ‘क्वाटिंको’ या सिरीजच्या पहिल्या पर्वामुळे विदेशी प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवण्यात ही ‘देसी गर्ल’ यशस्वी झाली होती. आता पुन्हा प्रियांका गाजत आहे ती याच सिरीजच्या दुसऱ्या पर्वासाठी. ‘क्वांटिको’च्या पहिल्या सिझननंतर ‘क्वांटिको २’ मध्येही ती अॅलेक्स पॅरिशची भूमिका साकारणार आहे. नुकताचं ‘क्वॉटिको २’ टीझर प्रदर्शित करण्यात आला. या सिजनमध्ये प्रियांका चोप्रा आणि जॅक मॅकलाफलिन यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहावयास मिळू शकते. याव्यतिरीक्त यात जोहाना ब्रॅडी आणि यास्मिन अल मास्री यांच्याही भूमिका आहेत. ‘क्वाटिंको २’ शिवाय प्रियांका ‘बेवॉच’ या चित्रपटातही एका भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती हॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. यात अलेक्झांड्रा दद्दारिओ, इलफेनेश हॅडेरा आणि केली या अभिनेत्री तसेच ड्वेन जॉन्सन (रॉक), झॅक एफरॉन, जॉन बॅस हे कलाकारही झळकणार आहेत.