News Flash

सनी लिओनी आहे तब्बल इतक्या कोटींची मालकीण

पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली.

सनी लिओनी

पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. ‘बेबी डॉल’ या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर तिचं आयुष्यच बदललं. त्यातही ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात तिने सहभाग घेतला. यावेळी खऱ्या आयुष्यात सनी कशी आहे, हे प्रेक्षकांना समजलं. आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण देणाऱ्या सनीच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्ही थक्क व्हाल.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सनीचा मुंबईतील बंगला, अमेरिकेतील फ्लॅट, महागड्या गाड्या हे सर्व मिळून एकूण ९७ कोटींची ती मालकीण आहे. काही वर्षांपूर्वीच सनीने अमेरिकेत फ्लॅट विकत घेतला. त्याची किंमत ३० कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जातं. तर मुंबईतील तिच्या बंगल्याची किंमत ३ कोटी इतकी आहे.

पाहा फोटो : हॉट, मादक, बोल्ड या शब्दांपलीकडची सनी लिओनी

सनीने २०११ मध्ये डॅनिअर वेबरशी लग्न केलं. सनीच्या संपूर्ण प्रवासात डॅनिअलने तिची साथ दिली. लग्नापूर्वी काही वर्ष हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांनी निशा या मुलीला दत्तक घेतलं. त्यानंतर सरोगसीच्या माध्यमातून त्यांना दोन मुलं झाली. त्यापैकी एकाचं नाव अॅशर आणि दुसऱ्याचं नोआ आहे. पती डॅनिअल आणि तीन मुलं असं सनीचं कुटुंब आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 1:30 pm

Web Title: sunny leone property details ssv 92
Next Stories
1 घटस्फोटानंतर हृतिकसोबत एकत्र राहण्यावर सुझान खान म्हणते..
2 ग्रॅजुएशननंतर अमिताभ यांच्या नातीने सुरु केला स्वत:चा हा बिझनेस
3 झी टॉकीजमुळे मे महिना होणार खास; प्रेक्षकांना मिळणार चित्रपटांची मेजवानी
Just Now!
X