बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत असते. सनीचे लाखो चाहते आहेत. चित्रपटसृष्टीत येण्याआधी सनी पॉर्न फिल्ममध्ये काम करायची या बद्दल सगळ्यांना माहित आहे. याबद्दल आता सनीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एक मोठा खुलासा केला आहे. तिने असे सांगितले आहे की तिचा पती डॅनियला तिचे असे काम करणे आवडत नव्हते.

“डॅनियलने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे.” असे सनी म्हणाली. मात्र, पॉर्न फिल्ममध्ये सनीने पर-पुरुषासोबत काम केलेले डॅनियलला आवडायचे नाही, म्हणून त्यानंतर त्या दोघांनी एकत्र काम करण्याच ठरवलं आणि अशा प्रकारे त्या दोघांनी मिळून एक नवीन कंपनी सुरू केली.

Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Drunken man's head stuck in garden
दारुच्या नशेत बागेत झोपला होता व्यक्ती, अचानक बाकामध्ये अडकलं डोक….पुढे जे घडले ते व्हिडीओमध्ये बघा
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच
When Russian Girl Came To Meet Dolly Chaiwala and request him in bill gates style one chai please
रशियन मुलीला पडली डॉलीच्या चहाची भूरळ, बिल गेट्सच्या स्टाइलमध्ये म्हणाली “वन चाय प्लीज”; पाहा Video

सनीने तिच्या आणि डॅनियलच्या भेटीबद्दल देखील सांगितले आहे. सनी म्हणाली, “आम्ही दोघे डॅनियलच्या बॅंडमध्ये असलेल्या त्याच्या मित्रांमुळे लासवेगसमधल्या एका क्लबमध्ये भेटलो होतो. पहिलांदा पाहताच डॅनियल माझ्या प्रेमात पडला होता. पण माझ्या मनात असे काही नव्हते. त्याचवेळी डॅनियलने कसा तरी माझा नंबर आणि ईमेल आयडी मिळवला. त्याच्याकडे माझा नंबर असूनही त्याने मला ईमेल केला होता, आणि अशा प्रकारे आम्ही बोलायला लागलो होतो.”

सनी लिओनी आणि डॅनियल यांनी २०११ मध्ये लग्न केले. त्यांना तीन सुंदर मुलेही आहेत. मोठ्या मुलीचे नाव निशा कौर वेबर आहे. निशाला त्यांनी दत्तक घेतले आहे. तर सरोगेसीच्या माध्यमातून त्यांना जुळे मुलं झाली आहेत. सनी नेहमीच सोशल मीडियावर आपल्या मुलांसह फोटो शेअर करते.

सनी लवकरच ‘अनामिका’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आहेत. सनीसोबत अभिनेत्री सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरम्मादेवी’मध्ये दिसणार आहे.