News Flash

सनीने सांगितला इंटिमेट सीन शूटचा अनुभव; ‘त्यावेळी अनेकजण ….’

सनीने पॉर्नपटांना अलविदा करत बॉलिवूडमध्ये जम बसविला आहे

सनी लिओनी

पॉर्नपटांना अलविदा करत बॉलिवूडमध्ये कमी काळात जम बसविलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या बळावर तिने इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान भक्कम केलं. विशेष म्हणजे चाहत्यांमध्येही तिची लोकप्रियता अफाट आहे. सध्या लॉकडाउन असल्यामुळे सनी तिच्या कुटुंबीयांसोबत घरीच आहे. या काळात ती सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून तिने अलिकडेच ऑनलाइन मुलाखतीत तिच्या करिअरमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यात इंटिमेट सीन देताना कोणकोणत्या अडचणी येतात हे तिने सांगितलं.

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत असताना इंटिमेट सीन देणं किती कठीण असतं हे तिने सांगितलं. जवळपास ५० लोकांच्या नजरा तुमच्यावर असतात, असं ती म्हणाली.

“इंटिमेट सीन देणं हे अत्यंत नैराश्यजनक काम असतं. हे सीन शूट करताना तुमच्या आसपास १०० लोकांचा वावर असतो. त्यातील ५० लोकांच्या नजरा तर कायम तुमच्यावर रोखून असतात. त्यामुळे इंटिमेट सीन देणं हे अत्यंत कठीण काम असतं. तसंच हे लोक हातात मस्तपैकी चहा घेऊन उभे असतात.तसंच जर मी या कलाविश्वात नसते तर मी मॅकडोनाल्डसाठी काम केलं असतं”,असं सनी म्हणाली.

दरम्यान, पॉर्नस्टार म्हणून सुरुवात करणाऱ्या सनी लिओनीने आपला मार्ग बदलत बॉलिवूडकडे वाटचाल केली. ‘बेबी डॉल’ या आयटम साँगने तिला बॉलिवूडमध्ये भरभरून प्रसिद्धी दिली. या गाण्यानंतर तिचं आयुष्यच बदललं. आज सनी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 11:23 am

Web Title: sunny leone says 50 people staring at you on shooting for intimate scenes ssj 93
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये पतीसोबत अजून राहू शकत नाही म्हणणाऱ्या महिलेला सोनू सूदचं भन्नाट उत्तर
2 वाजिद यांच्या संगीताने सदाबहार झालेली बॉलिवूडमधील गाणी
3 बहिणीसंदर्भातील ‘त्या’ वृत्तावर भडकला अक्षय कुमार; म्हणाला..
Just Now!
X