25 November 2020

News Flash

बिग बॉसमधील ‘या’ स्पर्धकाने केला होता सनी लिओनीचा विनयभंग

सनीचा एका स्पर्धकाने विनयभंक केला होता

पॉर्नपटांना अलविदा करणारी सनी लिओनी सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या बळावर सध्या बॉलिवूडसिनेसृष्टीत आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान सनी चित्रपटांबरोबर छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकत आहे. सध्या ती स्प्लिट्सविला (Splitsvilla) या प्रसिद्ध रिअॅलिटी शोचे निवेदन करत आहे. या शोमध्ये सनीचा एका स्पर्धकाने विनयभंग केला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

स्प्लिट्सविला हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. या शोच्या आठव्या पर्वात अभिनेता पारस छाब्रा स्पर्धक म्हणून सामिल झाला होता. त्यावेळी त्याने सनी लिओनीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. त्यानंतर सनीने शोच्या निर्मात्यांकडे त्याची तक्रार केली. तसेच त्याला शोमधून बाहेर काढण्याची विनंती देखील केली होती. परंतु त्याला केवळ सनीपासून दूर राहण्याची ताकिद देत सोडून देण्यात आले. शिवाय त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली गेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकरणानंतरही पारस त्या सिझनमध्ये जिंकला होता.

सध्या पारस बिग बॉस हिंदीच्या १३व्या पर्वात स्पर्धक म्हणून सामिल झाला आहे. बिग बॉसचे हे पर्व अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि पारसमध्ये होणाऱ्या भांडणांमुळे चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 4:30 pm

Web Title: sunny leone sexual harassment splitsvilla paras chhabra mppg 94
Next Stories
1 WWE सुपरस्टार जॉन सिनाच्या दिवाळी शुभेच्छा, शेअर केला रणवीरचा फोटो
2 … म्हणून मुलाच्या असह्य आजारात अशोक सराफ राहिले दूर
3 ‘ब्रेकअप’नंतर रविनाने केला होता आत्महत्येचा प्रयत्न…
Just Now!
X