News Flash

काय? सनीला करायचं पुन्हा लग्न, सोशल मीडियावर पोस्टद्वारे व्यक्त केली इच्छा

नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घ्या...

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात राहते. सनीचे लाखो चाहते आहेत. नुकतेच सनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सनीने तिचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. हे फोटो सनीच्या लेटेस्ट फोटो शूटमधले आहेत. यात सनीने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. सनीच्या या फोटोपेक्षा सनीच्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. “माझ्याशी लग्न कर” असे कॅप्शन सनीने ते फोटो शेअर करत दिले आहे. या कॅप्शनमुळे सनीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनीच्या या फोटोंवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एक विनोदी कमेंट करत म्हणाला, “अब्बा ऐकणार नाही” दुसरा म्हणाला, “लग्नाच्या आधी घटस्फोट घे”, तर तिसरा म्हणाला, “तुझं तर लग्न झालं आहे ना.”

सनी लवकरच ‘अनामिका’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आहेत. सनीसोबत अभिनेत्री सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरम्मादेवी’मध्ये दिसणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 6:34 pm

Web Title: sunny leone shared a photo on social media and asks marry again dcp 98
Next Stories
1 ‘ऍनिमल’चं ठरलं! रणबीर कपूर दिसणार प्रमुख भूमिकेत….
2 जान सानूने मर्जीविरोधात किस केले प्रकरणावर निक्कीचे स्पष्टीकरण
3 विकी कौशल करणार मानुषीसोबत रोमान्स; लवकरच दिसणार एकत्र
Just Now!
X