बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात राहते. सनीचे लाखो चाहते आहेत. नुकताच सनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिच्या नुकत्याच झालेल्या एका फोटो शूटमधला आहे. यात सनी ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात दिसत आहे. एवढंच नव्हे तर तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे देखील ती चर्चेत आहे. सनीने काळ्या रंगाचे ऑफ शोल्डर टॉप आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तिच्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच सनी केरळ मधून मुंबईत परत आली आहे. तिथे ती एमटिव्ही वरील स्पिल्टव्हिला या शोचे चित्रीकरण करत होती.
सनी लवकरच ‘अनामिका’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आहेत. सनीसोबत अभिनेत्री सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरम्मादेवी’मध्ये दिसणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 3, 2021 3:42 pm