News Flash

VIDEO: सनी लिओनीने शेअर केला ‘हिडेन बर्थडे व्हिडीओ’; सोशल मीडियावर व्हायरल

एक महिन्यापुर्वी साजरा केलेल्या ४० व्या वाढदिवसाचा व्हिडीओ शेअर केला. आतापर्यंत साडे सहा लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले.

(Photo: Instagram@sunnyleone)

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी चित्रपटात जरी झळकत नसली तरी ती कायम चर्चेत येतच असते. सनी लिओनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बरीच सक्रिय असते आणि तिचे सुंदर फोटोज आणि मजेदार व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच सनी लिओनीने एक महिन्यापुर्वी साजरा केलेल्या आपल्या ४० व्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ शेअर केलाय, जो तिने आतापर्यंत समोर आणलाच नव्हता. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने गेल्याच महिन्यात १३ मे रोजी तिचा ४० वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी लॉकडाउन सुरू होता म्हणून तिचा वाढदिवस घरीच कुटुंबियासोबत साजरा केला आला होता. एक महिन्यानंतर आता सनी लिओनीने तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा एक हिडेन व्हिडीओ शेअर केलाय. हा मजेदार व्हिडीओ शेअर करताना सनीने लिहिलं, ‘द हिडेन बर्थडे व्हिडीओ’. या व्हिडीओमध्ये सनीचा फनी अंदाज पहायला मिळाला. यात सनीने तिच्या डोक्यावर पिवळ्या रंगाचे फुगे बांधलेले दिसून आले.

इथे पहा सनी लिओनीचा मजेदार व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय. या व्हिडीओला आतापर्यंत साडे सहा लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर काही युजर्सनी तर या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनी लिओनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘बुलेट्स’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती. यात तिच्यासोबत करिश्मा तन्ना ही सुद्धा लीड रोलमध्ये होती. काही दिवसांत विक्रम भट्ट यांच्या ‘अनामिका’ या वेब सीरिजमध्ये ती दिसून येणार आहे. याशिवाय सनी मल्ल्याळम चित्रपट ‘शीरो’ आणि तमिळ चित्रपट ‘वीरमादेवी’ मध्ये सुद्धा दिसून येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 4:17 pm

Web Title: sunny leone shares hidden video of birthday celebration shows funny style prp 93
Next Stories
1 इंडियन आयडलच्या एका भागासाठी नेहा कक्कर घेते ‘इतके’ मानधन
2 अभिनेत्री नुसरत जहाँच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा! पती निखिल जैन अजूनही अनभिज्ञ?
3 शाहरुखच्या गाडीभोवती लोक गोळा झाले की सुहाना रडायची!
Just Now!
X