16 December 2017

News Flash

‘भूमी’ सिनेमातील सनी लिओनीच्या डान्सची झलक पाहिली का?

गाण्यासाठी सनीच असावी असं मला नेहमी वाटत होतं

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 13, 2017 12:17 PM

सनी लिओनी

इमरान हाश्मीच्या ‘बादशाहो’ सिनेमातील ‘पिया मोरे’ या गाण्यातील सनी लिओनीची जादू तिच्या चाहत्यांच्या मनातून उतरत नाही तोच आता तिचे अजून एक आयटम साँग प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. संजय दत्त याचा बहुचर्चित ‘भूमी’ सिनेमातही तिचे एक आयटम साँग असणार आहे. ‘ट्रिप्पी ट्रिप्पी’ असे या गाण्याचे नाव आहे. भूमीचा दिग्दर्शक ओमंग कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. या गाण्यातील सनीचे फोटो शेअर करत ओमंगने लिहिले की, ”भूमी’ सिनेमासाठी सनीचा नवीन लूक.’ सनीचे हे फोटो पाहून ती पुन्हा एकदा तिच्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करायला सज्ज झाली आहे असेच म्हणावे लागले. केसांपासून ते पायांच्या नखांपर्यंत दागिन्यांनी मढलेली सनी या गाण्यात फार सुंदर दिसतेय.

मुंबई विमानतळावर दिसली नवाब कुटुंबियांची झलक

एका मुलाखतीत ओमंग म्हणाला की, ‘सिनेमात हे गाणं एका महत्त्वाच्या क्षणी येतं. त्यामुळे गाण्यासाठी सनीच असावी असं मला नेहमी वाटत होतं. मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे.’ सनीनेही दीक्षा नागपालसोबत गाण्याचा सराव करतानाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये या दोन्ही मुली डान्सचा सराव करण्यासोबतच कशी मजा- मस्ती करतात हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे.

आतापर्यंत सनीने बॉलिवूडमध्ये अनेक आयटम साँग केले आहेत, त्यामुळेच तिला सारावाची फारशी गरज पडत नसावी. म्हणून ती त्यावेळेत मजा- मस्तीही करते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना तिने लिहिले की, ‘मी वचन देते की आपण डान्सचा चांगला सराव करु’
ओमंग कुमारच्या या सिनेमातून संजय दत्त अनेक वर्षांनी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाचा ट्रेलर पाहून सिनेमाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असेल यात काही शंका येणार नाही.

सिनेमाचा ट्रेलर मुद्दाम १० ऑगस्टला प्रदर्शित करण्याचा निर्णय भूमी सिनेमाच्या टीमने घेतला होता. या सिनेमात मुलगी आणि बाबांचे अनोखे नाते आणि त्यांच्या संघर्षाची कथा दाखवण्यात आली आहे. संजयची मोठी मुलगी त्रिशाला हिच्यासोबतही संजयचे असेच काहीसे अनोखे नाते आहे. त्रिशालाचा जन्म १० ऑगस्टचा आहे, म्हणून संजयने या सिनेमाचा ट्रेलरही १० ऑगस्टला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.

First Published on August 13, 2017 12:17 pm

Web Title: sunny leone sizzles in first look of bhoomi dance number trippy trippy