08 March 2021

News Flash

…अन् सनी तिच्यावर भडकली

महिलांवरुन टिप्पणी केल्यामुळे सनीचा राग अनावर झाला.

'स्प्लिट्सविला' स्पर्धक रितूवर सनी भडकली

‘एमटीव्ही’वरील प्रसिद्ध शो ‘स्प्लिट्सव्हिला’ नेहमीच विविध कारणांसाठी चर्चेत असतो. या शोच्या प्रत्येक सिझनमध्ये अनेक वादविवाद होतच असतात. यंदाचा दहावा सिझनसुद्धा काही वेगळा नाही. यातील स्पर्धकांना दिल्या जाणाऱ्या आव्हानांमुळे सुरुवातीपासून हा सिझन चर्चेत होता. या शोमध्ये सनी लिओनी नुकतीच एका महिला स्पर्धकावर भडकली. महिलांवरुन टिप्पणी केल्यामुळे सनीचा राग अनावर झाला.

या शोमध्ये स्पर्धकांना काही आव्हानं दिली जातात. दिलेली आव्हानं पूर्ण करणारे स्पर्धक शोमध्ये पुढे जातात. अशाच एका आव्हानादरम्यान रितू आणि रिपू या दोघांमध्ये वाद झाला. ‘तो एका महिलेसारखा वागत असून प्रत्येकाला नकारात्मक वागणूक देत आहे,’ अशी टीका रितूने केली. रितूच्या या वक्तव्यावरुन ‘बेबी डॉल’चा राग अनावर झाला आणि तिने रितूला सुनावलं.

PHOTO : जब काजोल मेट युवराज सिंग

‘महिलेसारखं वागत असल्याची टीका तू त्याच्यावर केलीस, हे योग्य नाही. मी सुद्धा एक स्त्री आहे. आपण सर्व मूर्ख आहोत असा त्याचा अर्थ होतो का? हेच तुला म्हणायचं आहे का? तू सर्व महिलांचा अपमान केला आहेस. आपणच इतरांसाठी उदाहरण ठरतो. अन्य कोणी हे करू शकत नाही.’ असं सनी तिला म्हणाली.

वाचा : ‘तारक मेहता..’च्या सेटवर दयाबेनचा शेवटचा दिवस 

‘स्प्लिट्सव्हिला’ या शोचे सूत्रसंचालन सनी आणि रणविजय सिंग हे दोघे मिळून करतात. हा एपिसोड २४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता एमटीव्हीवर प्रसारित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 6:18 pm

Web Title: sunny leone slams splitsvilla contestant for making sexist comments
Next Stories
1 माझी बायको मला जोड्याने मारते- संजय दत्त
2 करिश्मा स्टाईलने करिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
3 PHOTO : राखी सावंतचे राम रहिमसोबत फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Just Now!
X