News Flash

सनीने सांगितला तिचा फॅशन मंत्र

तिने एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीन्समुळे कायमच चर्चेत असते. फॅशन सेन्स आणि नृत्यकौशल्यामुळे तिने अनेकांच्या मनात घर केले आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनीने फॅशन टीप्स दिल्या आहेत.

सनीला ‘इंडिय एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत फॅशन सेन्सबद्दल काही प्रश्न विचारले होते. तेव्हा ती म्हणाली, “मला असे वाटते की माझ्याकडे खूप चांगला फॅशन सेन्स आहे. जेव्हा फॅशनची गोष्ट येते तेव्हा मी मोठ्या ब्रँडपेक्षा साध्या कपड्यांना प्राधान्य देते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनीचा ‘अनामिका’ हा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आहेत. सनीसोबत अभिनेत्री सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त सनी कॉमेडी हॉरर चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरम्मादेवी’मध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 7:30 pm

Web Title: sunny leone talked about her fashion sense and her fashion mantra dcp 98 avb 95
Next Stories
1 माझा पगार ऐकून सलमान सरांना धक्काच बसला, मग…
2 ‘तुझं माझं जमतंय’फेम रोशन विचारेची सोशल मीडियावर चर्चा
3 मुन्नाभैय्या शेतकऱ्याच्या रुपात; ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका