25 February 2021

News Flash

सनी लिओनीचा नवाजुद्दीनसोबत रोमान्स!

सनी तिच्या आगामी चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत काम करणार असल्याचे समजते.

सनी लिओनी.

पोर्नपट ते बॉलीवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनीसोबत स्क्रिन शेअर करण्यास आघाडीचे अभिनेते कचरत असले तरी ‘बॅक टू बॅक हिट’ चित्रपट देऊन सनीने बॉलीवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. बॉलीवूड वर्तुळात सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार सनी तिच्या आगामी चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत काम करणार असल्याचे समजते.

सोहेल खानच्या एका चित्रपटात सनी लिओनी आणि नवाजुद्दीन एकत्र येणार आहेत. नवाजुद्दीन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून सनी लिओनीसोबत तो रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आणि नवाजुद्दीन पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. सनी लिओनीने आजवर आपल्या चित्रपटातून  मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले आहे. तर, नवाजुद्दीन गंभीर भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही आगळीवेगळी जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र येणार असल्याच्या चर्चेने चित्रपटरसिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी करणार असून चित्रपटाचे कथानक प्रौढ विनोदी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2015 4:26 pm

Web Title: sunny leone to romance nawazuddin siddiqui in sohail khans next
टॅग : Sunny Leone
Next Stories
1 लाडक्या आराध्याला वाढदिवसानिमित्त अभिषेकच्या शुभेच्छा
2 ‘पीआरडीपी मुमेन्ट’ पाठवण्याचे सलमानचे आवाहन!
3 अमिताभ बच्चन यांचा लोकल प्रवास
Just Now!
X