19 September 2020

News Flash

सनी लिओनीचे मराठीत पदार्पण

अवधूत गुप्तेच्या मराठी चित्रपटात सनी लिओनीची एण्ट्री

'रईस' चित्रपटात 'लैला मै लैला' या आयटम साँगवर थिरकणारी सनी आता मराठी प्रेक्षकांनाही तिच्या अदांनी घायाळ करणार आहे.

बॉलिवूडमध्ये अगदी अल्पावधीतच चाहत्यांची मने जिंकणारी बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी मराठीत पदार्पण करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत होती. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण सनी लवकरच एका मराठी चित्रपटातून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का देण्यास येत आहे.

बादशहा शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात ‘लैला मै लैला’ या आयटम साँगवर थिरकणारी सनी आता मराठी प्रेक्षकांनाही तिच्या अदांनी घायाळ करणार आहे. आगामी ‘बॉईझ्’ या चित्रपटात ती आयटम साँगवर डान्स करताना दिसणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती स्वतः गायक अवधूत गुप्ते यानेच दिली आहे. अवधूत म्हणाला की, ‘आमच्या चित्रपटात सनी एक आयटम नंबर करत आहे. आम्हाला या चित्रपटाद्वारे मराठीत कधीच झाले नाही असे काही तरी करून दाखवायचे होते. त्यामुळे बॉलिवूडमधील सुप्रसिध्द चेहऱ्याचा यात उपयोग करून घ्यायचे आम्ही ठरवले. यासाठी निर्माता राजेंद्र शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि त्यासाठी ते कायम सनीच्या संपर्कातही होते. चित्रपटातील सनीच्या सहभागाने आम्हाला खूप आनंद झाला आहे.’

या आयटम साँगचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले. सुनिधी चौहानने गायलेल्या या आयटम साँगचे संगीत दिग्दर्शन अवधूत गुप्ते यानेच केले आहे. तर हिंदीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केलेय.  ‘बॉईझ्’ या चित्रपटाच्या नावातूनच हा चित्रपट तरुण पिढीवर आधारित असल्याचे समजते.

‘वल्गर अॅक्टिविटीज इन्क’ या चित्रपटातून सनी मराठीत पदार्पण करणार असल्याचे वृत्त याआधी आले होते. मात्र, सुजय डहाके दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 6:24 pm

Web Title: sunny leone to sizzle in a marathi item song in boys movie
Next Stories
1 ‘बाहुबली २’ चारवेळा पाहिल्यानंतर रामूची ‘ट्युबलाइट’वर कमेंट
2 ‘हर हर महादेव’ म्हणत ‘जाबाज ज्युलियाने’ केली गंगा आरती
3 राजकुमारच्या लग्नमंडपावर २ कोटी रुपयांचा खर्च!
Just Now!
X